आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे विहीर नव्हे, शेती चोरीला गेलीय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- "जाऊतिथे खाऊ' या चित्रपटात विहीर चोरी गेली होती. अकोट तालुक्यात असंच काहीसं घडलंय. पण येथे विहीर नव्हे, तर चक्क शेतजमीन चोरीला गेली आहे. अकोट ते हिवरखेड मार्गावरील लाखो रुपये किमतीची १६ गुंठे शेतजमीन चोरीस गेल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवर काय कारवाई करावी, हे पोलिसांनाही समजेनासे झाले
आहे. त्यामुळे तूर्तास हे प्रकरण चौकशीत ठेवून त्यांनी महसूलची मदत घेण्याचे ठरवले आहे.
सोने-नाणे, चल संपत्ती, वाहने, जनावरे आदींची चोरी होते, हे आपल्याला माहित आहे. मात्र, अचल म्हणजे स्थावर मालमत्तेची चोरी होण्याची घटना जरा भुवया उंचावणारीच. जमीन चोरीची ही तक्रार छोटेखाँ हैदरखाँ रा. टेकडीपुरा यांनी ग्रामीण पोलिसांत केली आहे. तक्रारीनुसार, हिवरखेड मार्गावर शेत सर्व्हे. नं. १३/३ मध्ये छोटेखाँ यांच्या मालकीची १६ गुंठे जमीन आहे. ही जमीन रेल्वे लाइनला लागून आहे. छोटेखाँ यांनी १९ नोव्हेंबर २०१३ रोजी या शेतजमिनीची मोजणीसुद्धा तालुका भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केली होती. या मोजणीचा रजिस्ट्रेशन क्रमांक ७३७/२०१३ असा आहे. तथापि, अकोट-खंडवा रेल्वेमार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित असून जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. शेतीचेे भाव गगनाला भिडले आहेत. कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस फेरफार करण्यात येत असल्याचा आरोप छोटेखाँ यांनी केला आहे.त्यामुळे तूर्तास हे प्रकरण चौकशीत ठेवून त्यांनी महसूलची मदत घेण्याचे ठरवले आहे.

सोने-नाणे, चल संपत्ती, वाहने, जनावरे आदींची चोरी होते, हे आपल्याला माहित आहे. मात्र, अचल म्हणजे स्थावर मालमत्तेची चोरी होण्याची घटना जरा भुवया उंचावणारीच. जमीन चोरीची ही तक्रार छोटेखाँ हैदरखाँ रा. टेकडीपुरा यांनी ग्रामीण पोलिसांत केली आहे. तक्रारीनुसार, हिवरखेड मार्गावर शेत सर्व्हे. नं. १३/३ मध्ये छोटेखाँ यांच्या मालकीची १६ गुंठे जमीन आहे. ही जमीन रेल्वे लाइनला लागून आहे. छोटेखाँ यांनी १९ नोव्हेंबर २०१३ रोजी या शेतजमिनीची मोजणीसुद्धा तालुका भूमी अभिलेख कार्यालयामार्फत केली होती. या मोजणीचा रजिस्ट्रेशन क्रमांक ७३७/२०१३ असा आहे. तथापि, अकोट-खंडवा रेल्वेमार्गाचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात शेतजमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. काही धनाढ्यांकडून तहसीलमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस फेरफार करण्यात येत असल्याचा आरोप छोटेखाँ यांनी केला आहे.

चौकशी करू
शेतजमीनचोरीस गेल्याचे प्रकरण महसूल विभागाशी संबंधित आहे. महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणी काय निष्कर्ष काढता येईल, याबाबत चर्चा करणार आहे. किशोरशेळके, ठाणेदार, ग्रामीण पोलिस ठाणे, अकोट

ते म्हणतात-शेतीच नाही
याप्रकरणीनोंदीसाठी छोटेखाँ यांनी तहसील कार्यालयात प्रकरण दाखल केले असता, तलाठी संजय तळोकार आणि मंडळ अधिकारी प्रवीण घोटकर यांनी सदर शेती अस्तित्वातच नसल्याचे निवासी नायब तहसीलदारांना कळवले आहे. त्यामुळे हे शेत जमीन चोरीस जाण्याची शक्यता नाही, असे तारे त्यांनी तोडले आहेत.