आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंजा दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात अलर्ट जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कारंजाशहरात एका मुलीची छेड काढल्यावरून दोन गटांत दंगल झाली. त्याचे पडसाद अकोल्यात उमटू नयेत, म्हणून पोलिसांनी सावध भूमिका घेत, शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासून अलर्ट जारी केला असून, पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

रस्त्याने जाणाऱ्या एका समाजातील काही मुलांनी तिची छेड काढली. या वेळी मुलीच्या समर्थनार्थ काही मुलांनी भिन्न धर्मीय युवकाला चांगलाच चोप दिला. त्यावरून दोन्ही गटांतील युवक समोरासमोर आल्यामुळे वाद चिघळला. पोलिस पोहोचेपर्यंत वादाचे रूपांतर तुफान दंगलीत झाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला. कारंजाला लागूनच अकोला जिल्हा सुरू होत असल्यामुळे दक्षता म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सतर्कतेचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. त्यासाठी स्पेशल फोर्ससुद्धा मंगळवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. रमजानचा महिना असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून सर्वच पोलिस ठाण्यांनी त्यांच्या जवानांचा बंदोबस्त लावला होता. दुपारपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली अाहे.
बातम्या आणखी आहेत...