आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात होणार उच्च शिक्षित युवक युवती परिचय संमेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अग्रवाल समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून अकोल्यात अग्रवाल समाजातील उच्च शिक्षित युवक युवती परिचय संमेलन घेण्यात येत आहे. आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात हे संमेलन घेण्यात येत असून, यावर्षी देखील शहरात रविवार, १९ मार्च रोजी एक दिवसीय परिचय संमेलन घेण्यात येत आहे. गोरक्षण रोड येथील शुभमंगल हॉल येथे अग्रवाल समाजातील उच्च शिक्षित युवक युवती परिचय संमेलन होणार आहे, अशी माहिती संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश खेतान यांनी दिली. अग्रसेन भवन येथे रविवार, मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. 
 
गोरक्षण रोड येथील शुभमंग फंक्शन हॉल येथे १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन स्थळ युवक युवती पालकांची आहार निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, संमेलनच्या ठिकाणी युवक युवतींसाठी कुंडली मिलान, पुरोहित सेवा, स्टेशनरी, प्रथमोपचार सहाय्यता या सोयी देण्यात येणार आहेत. तसेच प्रस्तावित युवक युवती संपूर्ण माहितीची अद्यावत रंगीत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तीकेचे संपादन प्रकाशन समितीचे डॉ. सुधीर लोहिया, महेंद्र खेतान, जितेंद्र छावछरीया, मदनलाल अग्रवाल, कमल अग्रवाल, अशोक भगवानपुरीया, संजय टिकुपोते, नंदकिशोर अग्रवाल, सुनिल पसारी, गणेश अग्रवाल यांनी केले आहे. संमेलनाला आमदार गोपीकिशन बाजोरीया, माजी आमदार बबनराव चौधरी, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, अॅड. डी. डी. तुलशान, बी. एम. अग्रवाल, विजय अग्रवाल, अशोक दालमिया, अॅड. विनोद लोहिया, कमलकिशोर अग्रवाल, डॉ. के. के. अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, निरंजन अग्रवाल, श्रीकिसन अग्रवाल, रामअवतार अग्रवाल, रुपचंद अग्रवाल, विजय सिंघानीया, विनोद खेतान यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

संमेलनासाठी अोमप्रकाश गोयनका, ओमप्रकाश पाडिया, विजय गोयनका, गिरधारीलाल अग्रवाल, अमोल अग्रवाल, अनिल अग्रवाल, अनुप गोयनका, अरुण बजाज, गोविंद खेतान, लक्ष्मीकांत पाडिया, ललित गुप्ता, मनोज मुरारका, मनिष सुरेका, निहार अग्रवाल, महावीर गोडोदिया, नंदकिशोर अग्रवाल, नितीन गोयनका, पुष्कर गुप्ता, संतोष गोयनका, सुमित अग्रवाल, शत्रुघ्न सिंघानिया, विजय छावछरिया हे परिश्रम घेत आहेत, अशी माहिती उमेश खेतान यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष नवलकिशोर भरतीया, मुख्य संयोजक दिलीप गोयनका, कार्याध्यक्ष सुभाष बंसल, संयोजक अश्विन बाजोरिया, शैलेंद्र कागलीवाल, सहसंयोजक गिरधारीलाल अग्रवाल, मदनलाल अग्रवाल, महामंत्री दिपक गोयनका, मंत्री दिपक रुहाटिया, अशोक भगवानपुरीया, उपाध्यक्ष अशोक अग्रवाल, संतोष अग्रवाल, डॉ. सुधीर लोहिया, कोषाध्यक्ष महेंद्र खेतान, महिला मंडळ अध्यक्षा संगीता केडीया, सचिव प्रिती गुप्ता, अनुराग झुनझुनवाला, सागर अग्रवाल, नवयुवती मंडळाच्या अर्चना लोहिया, साक्षी लोहिया उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...