आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला... आला... व्रत वैकल्याचा सण, उत्सवाचा श्रावण मास आला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरवाईची शाल पांघरूण निसर्गाच्या मनोहारी रूपाची मोहिनी घालणारा, चैत्यनाची टवटवी घेऊन येणारा सण, उत्सव विविध व्रत वैकल्याने महिलांना भुरळ घालणाऱ्या पवित्र श्रावण मासाला शनिवारपासून (दि. १५) सुरुवात होणार आहे.पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवाईची शाल पांघरूण नटून जातो. आटलेले जलस्रोत सजीव होऊन खळखळ वाहू लागतात. त्यातील काही धबधब्यांचे रूप घेतात. तळ गाठलेली धरणे श्रावणातच भरून जातात. वेगवेगळ्या पिकांनी शेतशिवार फुलून जाते. पिके डोलू लागतात. रानवनस्पती, वेली नाजूक फुले अंगावर घेऊन बहरू लागतात. पारिजातक, जाई-जुई, रातराणीचा मंद सुवास आसमंतात दरवळू लागतो. नभातील इंद्रधनुष्य आकाशाचे सौंदर्य वाढवून टाकतो. अशा या श्रावण मासाला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
पुढे वाचा... मंगळागौरी, हरितालिका आदी महिलांचे प्रमुख असलेले व्रत वैकल्य याच महिन्यात