आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा झालेल्या रुग्णाची औषधे दिली तापीच्या रुग्णाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वोपचार रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक मध्ये विषबाधा झालेला रुग्ण ताप असलेला रुग्ण शेजारी-शेजारी भरती आहे. रविवारी सकाळी विषबाधा झालेल्या रुग्णाला देण्यात येणारे इंजेक्शन सलाइन त्याला देता ताप असलेल्या रुग्ण युवकाला दिले. काही वेळानंतर युवक घामाघूम होऊन घाबरला. त्याच्या हालचाली पाहून त्याची आईसुद्धा घाबरली. लगेच स्टाफ रुममध्ये असलेल्या सिस्टरला बोलावले. त्यानंतर सिस्टरने युवकाची सलाईन काढली चुकीने झाल्याचे सांगून रुग्णांच्या नातेवाइकांचाच पानउतारा केला.
सर्वोपचार रुग्णालयाची आता सुपर स्पेशालिटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, येथील डॉक्टर अधिकारी इतर कर्मचाऱ्यांमध्ये काहीही बदल झालेले दिसत नाहीत. रविवारी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराने वाॅर्डातील सर्वच अवाक् झाले. शुक्रवारी तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथील ज्ञानदेव काशीराम बोदडे, वय ५७ वर्ष हे त्यांच्या शेतात तुरीवर किटकनाशकाचा फवारा मारत असताना त्यांना विषबाधा झाली. मळमळ उलट्या होत असल्याने त्यांना सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी वाॅर्ड क्र. मध्ये भरती केले त्यांच्यावर उपचार सुरू केले. शनिवारी रात्री त्यांच्याच शेजारी अकोला येथील इराणी मोहल्ल्यातील सै.जमीर सै. वजीर, वय २२ वर्ष या युवकाला ताप येत असल्यामुळे त्याच्या आईने भरती केले. या युवकाला ज्ञानदेव बोदडे यांच्याशेजारचा बेड दिला. रात्री त्याच्यावर उपचार केल्यानंतर सकाळी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, सकाळी वाॅर्डात असलेल्या परिचारिकेने ज्ञानदेव बोदडे यांचा उपचार त्यांच्यावर करता सै. जमीर याच्यावर केला. त्याला सलाइन त्यातून इंजेक्शनही दिले. काही वेळानंतर युवकाला घाबरल्यासारखे होऊ लागले. त्याला झटकेसुद्धा येऊ लागले. त्यानंतर त्याची आई घाबरली. ती लगेच स्टॉफ रुमकडे गेली. तिने तेथील परिचारिकेला सांगितले. त्यानंतर ती आली असता तिला तिची चूक समजली लगेच सै. जमीरची सलाइन काढून ती ज्ञानदेव बोदडे यांना लावली. दुपारी १२ वाजता युवकाला बरे वाटू लागले.

काय म्हणतात कर्मचारी
एकाचे औषध दुसऱ्याला दिले, याबाबत येथील स्टॉफ रुममधील कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, रुग्ण लवकर नाव सांगत नाहीत. त्यामुळे एखादवेळी चुकीने होतेही. मात्र, लगेच युवकाची सलाइन काढण्यात आली. हे विशेष.

तीन दिवसांपासून भरती
^शुक्रवारीशेतातीलतूर फवारण्यासाठी गेले असता नाकातोंडात विष गेल्याने विषबाधा झाली. आम्ही लगेच सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात आणले. आता तब्येत बरी आहे. -सुमन बाईबोदडे

माझा एकुलता एक मुलगा
^मलासै.जमीर हा एकुलता एक कमवता मुलगा आहे. त्याला ताप येत असल्यामुळे शनिवारी रात्री भरती केले. सकाळी त्याला शेजारी असलेल्या रुग्णाचे औषध देण्यात आले. सिस्टरला विचारले असता काही होत नाही, असे अनेकवेळा होते, असे उत्तर मिळाले. -शहीदाबी सैय्यद वजीर, सै. जमीरची आई
बातम्या आणखी आहेत...