आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराअभावी अारोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये ऑक्सिजनवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ग्रामीण भागातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यावर एकीकडे शासन प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये फक्त नावालाच उरल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्व काही उपकरणे सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना "रेफर टू अकोला'चा रोग जडला आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मिळत नसल्याने उपकरणे निकामी झाल्याची दिसून येत आहे.

अकोला शहरात वैद्यकीय शिक्षण संशोधन मंडळाच्या नियंत्रणात सर्वोपचार रुग्णालय, तर सार्वजनिक आरोग्य सेवेच्या नियंत्रणात जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यरत आहे. याशिवाय ग्रामीण भागात अकोट, तेल्हारा, बाळापूर, चतारी, बार्शिटाकळी येथे अत्याधुनिक व्यवस्था असलेले ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. मूर्तिजापूरला उपजिल्हा रुग्णालय आहे. याशिवाय ३० ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे १२० उपकेंद्रे कार्यान्वित आहेत, असे असतानाही ग्रामीण भागात उपचार वेळेवर मिळाल्याने अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय प्रसूतीची सर्व सुविधा या रुग्णालयामध्ये असताना सीरिअस आहे, असा शेरा लिहून सरळ वैद्यकीय अधिकारी जिल्हा स्त्री रुग्णालयात गरोदर महिलेस प्रसूतीसाठी रेफर करत असल्याचे दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्च करून अतिमहागडी वैद्यक साधनसामग्री असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांअभावी शासकीय रुग्णालये मृत्यूची केंद्रे बनली आहेत.

रुग्णसेवेला काळिमा :आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णसेवेला एकप्रकारे काळिमा फासलेला दिसून येतो. पॅरामेडिकल स्टॉफच्या भरवशावर रुग्णालय सोडून वैद्यकीय अधिकारी मात्र तालुक्याच्या ठिकाणी खुशाल राहत आहेत. रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ सेवा उपलब्ध आहेत. तरीसुद्धा त्या रुग्णांना सेवा दिल्या जात नाहीत. त्यामुळे सर्वोपचारमध्ये गर्दी होत आहे.

रेफरचे प्रमाण वाढले
अमरावती,खामगाव येथे शासकीय रुग्णालय असतानाही प्रसूतीसाठी भरती महिलांना थेट अकोला येथे रेफर करण्यात येते. हा प्रकार थांबणे गरजेचे आहे.

स्त्री रुग्णालयाचा बोजा वाढला
रुग्णांचीवाढती संख्या, आजूबाजूच्या जिल्ह्यांतून वाढलेले रेफर टू अकोलाचे प्रमाण वाढले असून, यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयालाच प्रसूती वेदना सहन कराव्या लागत आहेत.

बाह्यरुग्ण विभाग; वेळ वाढवा
अकोला सर्वोपचार रुग्णालय, बाह्यरुग्ण विभागाची वेळ दुपारी वाजेपर्यंत असते. याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता दुपारी ऐवजी दुपारी पर्यंत ओपीडी काढण्यात यावी. जेणेकरून बाहेरगावहून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही. एका दिवसात चिठ्ठी काढून डॉक्टरांना दाखवणे, सोनोग्राफी किंवा एक्स-रे काढणे शक्य होत नाही. कारण तोपर्यंत दुपारचे वाजलेले असतात डॉक्टर निघून गेलेले असतात.

उपयोग नाही
आरोग्य विभागाकडून दरवर्षी पीआयपीमध्ये मशिनी, उपकरणे मागायची. त्यांचा कोणताही उपयोग करायचा नाही, अशी प्रथाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत.

ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे
केंद्र, रुग्णालयात गरोदर महिला भरती झाली की, तीला थेट १०८ क्रमांकाच्या वाहनाने अकोला रेफर करायची प्रथाच सुरू झाली आहे.

ही पदे नावालाच
रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, फिजिशियन ही विशेषज्ञांची पदे आहेत. प्रत्यक्षात मात्र, या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा रुग्णांना मिळेनाशी झाली आहे.

रुग्णांना वेळेवर उपचार द्यावेत
^रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा, यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना दिल्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.'' डाॅ.अविनाश लव्हाळे, उपसंचालक,आरोग्य सेवा.

पदे रिक्त
रुग्णालयांमध्ये वर्ग वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञांची पदे रिक्त आहेत. पॅरामेडिकल स्टॉफ आरोग्य कर्मचाऱ्यांची असंख्य पदे रिक्त आहेत. वारखेड येथील स्वाती सचिन वाहुरवाघ यांच्या पोटात ऑक्टोबरच्या रात्री अचानक दुखू लागले. त्या दानापूर येथील आरोग्य केंद्रात गेल्या. मात्र, या ठिकाणी १२ कर्मचाऱ्यांपैकी केवळ एस. जी. घुगरे ही परिचारिका उपस्थित होती. डॉक्टर उपस्थित नसल्याने महिलेला अकोला स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले. दरम्यान, तिच्या पोटातच बाळाचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार झाली असून, मानवाधिकार संघ, दिल्ली येथे जानेवारीला सुनावणी होणार आहे.