आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटात चाेरटे सक्रिय; घरफाेडी करून एेवज लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- शहरातील विविध भागात चोरट्यांनी घरफोडीकरून ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारच्या रात्री घडल्या. अकोट शहरातील भाग्यश्री कॉलनी मधील प्रमोद आवारे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चांदीचे दागिने रोख असा एकूण ११ हजार २५० रुपये मुद्देमाल लंपास केला.तर नंदीपेठ भागातील गजानन भंगाडे, सुधाकर डांगरे, कैलास बोरोडे यांच्या घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.अकोट शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.तर अकोला मार्गावरील पूर्वा कॉलनी मधील संतोष कराळे यांची दुचाकी क्रमांक एमएच ३० टी ३३२१ घरासमोर उभी असताना चोरानी लंपास केली. 
बातम्या आणखी आहेत...