आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती-पत्नी रेल्वेतून पडले, पत्नीचा मृत्यू, चार तास पडून होते रेल्वे रुळावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आपल्यासंसाराला कुणाची नजर लागू नये, असे साकडे देवाला घालण्यासाठी अन्वी मिर्झापूर येथील नवविवाहित दाम्पत्य शेगावला दर्शनाला गेले होते. रात्रीच्या पॅसेंजरमध्ये गावी येण्यासाठी ते शेगावहून बसले होते. मात्र, पत्नीला मळमळल्यासारखे झाल्यामुळे ती गाडीच्या दारात आली. उलटी करत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिला वाचवण्यासाठी पतीने उडी घेतली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री वाजता निदर्शनास आली.
नीलेश नृपनारायण आणि रिना यांचा विवाह तीन महिन्यांपूर्वीच झाला. नीलेश अन्वी मिर्झापूर ते बोरगावदरम्यान ऑटो चालवतो. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असताना आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळणार, असा विचार स्वप्नातही नीलेशने केला नसावा. आपल्या बेताच्या परिस्थितीत शेगावच अवघी पंढरी म्हणून दोघांनीही सोमवारी शेगावला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला होता. त्यांनी श्रींचे दर्शन घेऊन अख्खा दिवस आनंदसागरमध्ये घालवला. त्यातच त्यांना रात्र झाली. रात्री ८.३० वाजता ते भुसावळ-नागपूर पॅसेंजरने गावी परतण्यासाठी निघाले होते. गाडीत चढल्यानंतर काही वेळाने रिनाला मळमळल्यासारखे वाटले. त्यामुळे ती दारात उलटी करण्यासाठी आली, सोबत नीलेशही आला. उलटी करत असताना तिचा तोल गेला आणि ती धावत्या गाडीतून खाली पडली. पत्नीचे डोके धरून असलेल्या नीलेशनेही लगेच तिच्या पाठोपाठ उडी घेतली. या वेळी रिनाचा जागीच मृत्यू झाला, तर पती नीलेश नृपनारायण हा गंभीर जखमी झाला आहे.

रात्री दीडला दिसले
नीलेशआणि रिना हे दोघे पॅसेंजरमधून रात्री ९.३० वाजता गायगावच्याजवळ पोल नंबर ७७५/२०२२ जवळ पडले होते. रात्री १.३० वाजता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना एक महिला मृतावस्थेत, तर पुरुष जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. रिनाला वेळीच उपचार मिळाले असते, तर तिचे प्राण वाचू शकले असते. याप्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात रेल्वेचे कनिष्ठ अभियंता नीलेश रामराव मंडपे यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद उरळ पोलिसांनी केली आहे. घटनेचा तपास बीट जमादार दादाराव लिखार करीत आहेत.