आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस कारावास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकले होते. या प्रकरणातील आरोपी पतीस न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मूर्तिजापूर येथील रहिवासी मीणा शिवरकर यांचे पती लक्ष्मण शिवरकर यांना दारू पिण्याची सवय होती. दारू पिण्यासाठी तो वारंवार पत्नीला पैसे मागत होता. त्यामुळे पत्नी वैतागली होती.
जूनच्या रात्री दारू पिण्याच्या कारणाहून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यानंतर १० सप्टेंबर रोजी दारू पिण्यासाठी परत पतीने पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून टाकले पळ काढला. मीणाबाईने आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या नागरिकांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. या ठिकाणी तिचे बयाण नोंदवण्यात आले. तिने सांगितले होते की, सप्टेंबर रोजी पतीला एक हजार रुपये दिले होते. तरीसुद्धा आणखी पैसे मागण्यासाठी तो त्रास देत हाेता. यामुळेच त्याने रागाच्या भरात अंगावर रॉकेल टाकले, असे तिने सांगितले होते. उपचारादरम्यान १६ सप्टेंबर रोजी मीणाबाईचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र प्रथम न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात आज खटला चालला. सरकारतर्फे अधिवक्ता पी. पी. नागरे यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...