आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तक्रार देण्यास सोबत येत नसल्याने पतीने घातला पत्नीच्या डोक्यात पाटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पतीच्या डोक्याला कधीतरी गंभीर दुखापत झाली होती. गत काही दिवसांपासून चार ते पाच लोकांनी त्याला मारल्याने ताे त्यांची नावे घेत होता अाणि त्याच्यांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यासाठी ‘सोबत चल असे’, पत्नीला म्हणत होता; मात्र तो काहीतरी बडबड करत असल्याचे गृहीत धरून पत्नी त्याकडे दुर्लक्ष करत होती. पत्नी तक्रार देत नाही, याचा अर्थ तिचे त्या माणसासोबत संबंध आहेत, अशा संशयाचे भूत पतीच्या डोक्यात घुसले आणि त्याने शुक्रवारी सकाळी पहाटे पत्नी पहुडली असताना मसाला वाटण्याचा मोठा दगडी पाटा उचलला तिच्या डोक्यात घातला. यातच पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना अकोल्यातील कृषिनगरात घडली. कविता रमेश तायडे असे संशयाची शिकार ठरलेल्या महिलेचे नाव आहे. 


शहरातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कृषी नगरात पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.त्यानंतर पाेलिसांनी साहित्यही जप्त केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी शहर पाेलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पाहणी केली. 


आरोपीने दिली खुनाची कबुली 
कृषी नगरातील हत्याकांडप्रकरणी सिव्हिल लाइन्स पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पती रमेश तायडे याला अटक केली अाहे. पाेलिसांनी अाराेपीची कसून चाैकशी केली. चाैकशीअंती त्याने खुुनाची कबुली दिली आहे. 


पाण्यासाठी उठली नंतर झाला अंत 
आरोपी पती हा संशयी स्वरूपाचा असल्याचे पाेलिस सूत्रांचे म्हणणे अाहे. ताे नेहमीच वाद घालत हाेता. पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कविता तायडे पहाटे मुलाला पाणी देण्यासाठी झाेपेतून उठल्या. त्यानंतर पती-पतीमध्ये वाद झाला. त्यानंतर ती अंथरुणावर पहुडली. अशातच पतीने पत्नीच्या डाेक्यात पाटा घातला. प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...