आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादल्या दिवशी पत्नीला मारहाण, दुसऱ्या दिवशी गळा अावळून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील प्राध्यापकाने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना साेमवारी उघडकीस अाली. रणपिसे नगरातील माधुरी कोल्डड्रींग्सजवळ असलेल्या रॉयल पॅलेसमध्ये फ्लॅट नंबर २०१ मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी पतीला तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात सोमवारी पत्नीच्या शारिरिक मानसिक छळाच्या आरोपाखाली खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

प्राध्यापक योगेश मधुकरराव वडतकर असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी अम्रिता हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप अम्रिताची आई अलका मदनराव काळमेघ यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली येथील योगेश मधुकरराव वडतकार याचा विवाह नोव्हेंबर २००९ रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा येथील डॉ. मदनराव काळमेघ यांची मुलगी अम्रिता उर्फ राणी हिच्यासोबत झाला. त्यानंतर योगेश आणि अम्रिता यांच्या संसारवेलीवर अभिजय स्वर अशा दोन मुलांचा जन्म झाला. काही दिवसांनंतर अम्रिताचा पती योगेश हा माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक मानसिक छळ करू लागला.
अम्रिताने अनेकवेळा पतीकडून मारहाण छळ केल्या जात असल्याच्या तक्रारी आई आणि बहिणीकडे केल्या होत्या. मात्र काही दिवसांनी बदल होईल आणि सारे काही व्यवस्थित होईल म्हणून नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र २५ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी अम्रिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. या प्रकरणी रविवारी नातेवाईकांनी तक्रार केल्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती.
मात्र सोमवारी नातेवाईकांना संशय आल्यामुळे त्यांनी अम्रिताचा गळा आवळून खून केल्याचा आरोप करीत सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी पती योगेश मधुकरराव वडतकर, सासरा मधुकरराव वडतकर, सासू सुशीला मधुकर वडतकर, नणंद सुनिता कडू, मंजू मेघे आशा बारब्धे यांच्याविरुद्ध भादंवी ३०२, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती योगेश वडतकर याला तत्काळ अटक केली आहे.
नातेवाईकांचासंताप आणि पोलिसांचा संयम
आपलीमुलगी, आपली बहिणीच्या मृत्यूने नातेवाईकांचा संताप साहजिकच होता. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, त्याला तत्काळ अटक व्हावी म्हणून नातेवाईकांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. त्यांच्या भावनेचा आदर करीत ठाणेदार अन्वर एम. शेख, सहायक पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, आशिष इंगळे यांनी गुन्हा दाखल करीत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. अम्रिताच्या नातेवाईकांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी प्रसंगावधान राखत आरोपीला खदान पोलिस ठाण्यात ठेवले. नातेवाईकांची समजूत घालून त्यांना पाठवल्यानंतर आरोपी योगेश वडतकार याला ठाण्यात आणले. दरम्यान, अाता पाेलिस या प्रकरणाचा तपास पाेलिस करत अाहे. प्रदेश काॅग्रेसचे प्रवक्ते डाॅ. सुधीर ढाेणे यांनी पाेलिस अाणि नातेवाइकांमध्ये समन्वयकाची भूमिका निभावली.
अम्रिताइंग्रजी विषयात गोल्ड मेडल : अम्रिताही उच्च शिक्षित असून इंग्रजी विषयात तिने एम.ए. केले आहे. तसेच ती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची गोल्ड मेडल आहे. दोनच दिवसांपूर्वी तिला शहरातील एका महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी नोकरीची ऑफर आली होती.
आरोपी दहिहांडा येथे आहे प्राध्यापक
आरोपी प्राध्यापक योगेश वडतकर हा दहिहांडा येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करतो. त्याने २०१२ मध्ये फ्लॅट घेण्यासाठी पत्नीला तिच्या माहेरहून १५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. त्यानुसार अम्रिताच्या आईने दोन एकर शेती विकून १२ लाख रुपये तर तीन लाख उधार घेऊन योगेशला दिले होते.
चिमुकल्या अभिजय स्वरचे काय?
योगेश आणि अम्रिता यांना सहा वर्षाचा अभिजय आणि दोन वर्षाचा स्वर असे दोन मुले आहेत. अभिजय आणि स्वर हे आता आईच्या मायेला मुकले आहेत. त्याचे वडिल आणि आजीआजोबा यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. वडिलांना तर पोलिसांनी लगेच अटक केली आहे. आता या चिमुकल्याचे काय, त्यांचा दोष तरी काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात काहूर माजवत आहे.
माेठ्या अानंदात साजरा केलेल्या स्वरच्या वाढदिवसाला अाता त्याची अाई नसणार ...
स्वर अवघा दोन वर्षाचा..२३ सप्टेंबरला त्याच्या जन्माला दोन वर्ष पूर्ण झाली. शुक्रवारी त्याचा वाढदिवस होता. आईने स्वरच्या वाढदिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यासाठी शेगावची निवड केली. त्यासाठी तो भाऊ अभिजय आईवडिलासह शेगावला गेला. आनंदसागरमध्ये दोघे भाऊ खेळले. तेथेच त्याचा वाढदिवस साजरा झाला. आई अम्रिताने त्याचा गोड पापा घेत आपल्या चिमुकल्याचे औक्षण केले. त्याला आर्शीवाद दिले आणि अनेक स्वप्ने पाहिली. मुलांना एन्जॉय करता यावा म्हणून हे दाम्पत्य तीन दिवस शेगाव येथे मुक्कामाला थांबले होते. अाईसाेबतचा घालवलेला हा वाढदिवस अखेरचाच असेल, हे स्वरला काय माहित? त्यांनतर तीन दिवसांनी स्वरची आई देवाघरी गेली. आता स्वरचे वाढदिवस होतील. त्याच्या वाढदिवसाला सर्वच असतील.. मात्र त्याची जन्मदात्री नसेल..याची खंत स्वरसह अभिजयला राहील..
बातम्या आणखी आहेत...