आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपेत असताना डोक्‍यात दगडी पाटा घालून पत्‍नीची हत्‍या, अकोल्‍यातील घटनेने खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पत्‍नी झोपेत असताना तिच्‍या डोक्‍यात दगडी पाटा घालुन हत्‍या केल्‍याची खळबळजनक घटना अकोल्‍यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला पतीला अटक केली असून त्‍याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेला आहे. कविता रमेश तायडे असे मृत महिलेचे नाव आहे.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी रमेश तायडे याच्‍या डोक्‍याला पूर्वी गंभीर दुखापत झाली होती. 4 ते 5 लोकांनी आपल्‍याला मारले असून त्‍यांच्‍याविरोधात तक्रार देण्‍यासाठी पोलिसांत चल, असे तो सारखे पत्‍नीला म्‍हणत असे. मात्र पती अशीच काहीतरी बडबड करत असेल म्‍हणून पत्‍नी कविता रमेश तायडे त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष करत. पत्‍नी आपल्‍यासोबत तक्रार देण्‍यासाठी येत नाहीत याचा अर्थ तिचे त्‍या माणसांसोबत संबंध आहेत, असे संशयाचे भूत नंतर आरोपी पतीच्‍या डोक्‍यात शिरले. याच समजातून आज शुक्रवारी सकाळी 5.30 वाजता पत्‍नी अंथरुणात पहुडलेली असताना त्‍यांच्‍या डोक्‍यात मसाला वाटण्‍याचा मोठा दगडी पाटा आरोपीने घातला. यात पत्‍नीचा जागीच मृत्‍यू झाला.

 

अकोल्‍यात कृषीनगर येथे ही घटना घडली आहे. या पती-पत्‍नीला दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्‍ही मुलींचे लग्‍न झालेले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्‍याने खुनाची कबुली दिेली आहे.   

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...