आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीची हत्‍या केलेल्‍या पतीची जन्मठेप खारीज करून सात वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पत्नीच्या हत्येत पतीला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल खारीज केला आरोपीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवत त्याला सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

बार्शीटाकळी पोलिसांनी विवाहिता पार्वताबाई प्रल्हाद भालेराव यांना जिंवत जाळल्याच्या आरोपाखाली पती प्रल्हाद नानाजी भालेराव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात झाली होती. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपी भालेराव यांचे वकील अॅड. अमोल जलतारे, अॅड. आशिष देशमुख यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.आर. गवई ए.एस. चांदूरकर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. आरोपीचे वकिल यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, पोलिसांनी मृतकाचे पहिले बयाण जाणीवपूर्वक लपवले. 

पोलिस ठाण्यात पहिल्यांदा नोंद करण्यात आलेल्या पहिल्या बयाणामध्ये विवाहितेचा मृत्यू एक दुर्घटना होती. आरोपीने ती जळत असताना तिला विझवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही हत्या होऊ शकत नाही. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपासच योग्य दिशेने केला नाही. आरोपीचा हा युक्तीवाद आणि सरकारपक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीच्या शिक्षेचे रुपांतर सात वर्षाच्या कैदेत केले. 
बातम्या आणखी आहेत...