आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधी कॅम्प येथे अवैध बांधकामावर 'हातोडा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिंधी कॅम्प भागातील पक्की खोली येथील अवैध बांधकाम मंगळवारी पाडण्यात आले.
अकोला - महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेता बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीवर अतिक्रमण विभागाचा हातोडा चालला. ही कारवाई मंगळवारी सिंधी कॅम्प येथील पक्की खोली येथे करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

महापालिकेचे आयुक्त अजय लहाने यांच्या आदेशानुसार मंगळवारी सिंधी कॅम्प येथील पक्की खोली येथील राधेशाम पारवानी यांचे हजार ५०० चौरस फूट संतोषकुमार पारवानी यांनी ८०० चौरस फूट बांधकाम कोणतीही परवानगी घेता केले. या बाबत तक्रार आल्यानंतर अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकामार्फत पाडण्यात आले. शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात एका अपाअर्मेंटचे अनधिकृत बांण्धकाम पाडल्यानंतर सोमवारी दोन अपार्टमेंटचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. त्यामध्ये रिंग रोडवरील अनधिकृत बांधकाम तोडलेल्या इमारतीवर मंगळवारी पुन्हा कारवाई करण्यात आली. शहरातील आणखीही अशा निर्माणाधिन अनधिकृत इमारतींची बांधकामे येत्या काही दिवसांत पाडल्या जाणार आहेत.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना महापालिका प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरीही काही बांधकाम व्यावसायिक नोटीसला जुमानता बांधकाम करीत आहेत. ही कारवाई आयुक्त अजय लहाने यांच्या नेतृत्वात क्षेत्रिय अधिकारी कैलास पुंडे , सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण विभागाचे विष्णु डोंगरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे, संजय थोरात, प्रवीण मीश्रा, विजय बडोणे, विनोद वानखडे, रुपेश इंगळे, जेसीबी चालक तेजराव बन्सोड, बाबाराव सिरसाट, मधुकर कांबळे यांनी केली.

दोन दिवसांतील कारवाया
>जवाहर नगर चौक भागातील उमरी सर्वे नंबर १२-२ भूखंड क्रमांक १० वर नरेश देशमुख किशोर केला यांची दुकाने प्लॅटचे चार मजली बांधकाम
>संत तुकाराम चौक भागातील डॉ. शालिग्राम वानखडे आणि वनमाला वानखडे यांच्या अवैध बांधकामावरही कारवाई करण्यात आली. मौजे मलकापूर सर्व्हे नंबर ८११, भूखंड क्रमांक सहा या जागेवर बांधकाम केले आहे.
>राधेशाम पारवानी यांचे हजार ५०० चौरस फूट बांधकाम केले.
>संतोषकुमार पारवानी यांनी ८०० चौरस फूट बांधकाम केले
बातम्या आणखी आहेत...