आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीम बायपास चौकात पाडले अवैध बांधकाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाशीमबायपास चौकातील आसिफ खान मुस्तफा खान डॉ. रहेमान खान काले खान यांनी मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम केल्यामुळे त्यांचे निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम शुक्रवारी पाडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केली. या कारवाईमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आसिफ खान डॉ. रहेमान खान काले खान यांच्या सर्व्हे क्रमांक प्लाॅट नंबर एक अधिक दोन येथील ६०३ चौरस मीटर मंजूर नकाशा होता. वास्तवात त्यांनी २,४०० चौरस मीटर बांधकाम केले होते. त्यामुळे महापालिकेने १,८०० चौरस मीटर बांधकाम अनधिकृत असल्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे पूर्व बाजू ४.५० ऐवजी ०.२० , उत्तर बाजू ४.५० ऐवजी १.४८ तसेच पश्चिम बाजू ३.०० आणि दक्षिण बाजू ४.५० ऐवजी काहीही सोडलेले नव्हते. त्यामुळे मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त करण्यात आलेले बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण विभागाचे िवष्णू डोंगरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र टापरे, संजय थोरात, प्रवीण मिश्रा, विजय बडाेणे, सुनील गरड, विनोद वानखडे, रूपेश इंगळे, सुभाष राजपूत, योगेश माने, सिद्धार्थ सिरसाट, संतोष डोंगरे, सै. रफिक आणि तेजराव बन्सोड, बाबाराव सिरसाट यांनी केली.
वर्षभरापूर्वी बजावण्यात अाली हाेती नोटीस
समास अंतरामध्ये अनधिकृतपणे बांधकाम करत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २६० महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये अनधिकृत बांधकाम केल्यासंदर्भात मे २०१४ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. ३० दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.