आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेआठ लाखांची अवैध दारू पकडली; दोघांना अटक, 1 फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- परराज्यातून देशी विदेशी दारू आणून तीची जिल्ह्यात अवैधरित्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अटक केली. तर अंधाराचा फायदा घेवून तिसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातून दारुचे २३ बॉक्स एक क्रुझर गाडी असा एकुण साडे आठ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई १२ ऑगष्ट रोजी मध्यरात्रीचे सुमारास मोताळा येथे करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतुक विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल पासून पाचशे मीटरच्या आतील बिअर बार, वाईन शॉपी, देशी दारुची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अवैधरित्या दारुची विक्री वाहतुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. एवढेच नव्हेतर कमी कष्टात जादा पैसा कमवण्याच्या उद्देशाने अनेक लोकांनी अवैध दारू विक्रीचा धंदा सुरू केला आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक सुरेश चव्हाण, विशालसिंग पाटील अमोल सुसरे हे १२ ऑगष्टच्या मध्यरात्री गस्तीवर असताना त्यांना मलकापूर ते मोताळा रोडने एक क्रुझर गाडी वेगाने जातांना दिसली. संशय आल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी सदर गाडीचा पाठलाग करून तीला मोताळा येथे थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये केंद्र शासित प्रदेशातील विदेशी दारुचे २३ बॉक्स आढळून आले. यावेळी मलकापूर येथील गोपाल करंजीकर ५५ यास अटक करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेवून त्याचा साथीदार गणेश दयाराम पाटील रा. जांभुळधाबा हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव जिल्ह्यातील घाणखेड येथे माल साठवून ठेवल्याची माहिती दिली. या माहिती वरून पथकाने घाणखेड येथे जावून नंदकिशोर मनोहर करांडे वय ४५ यास अटक केली. यावेळी पथकाने त्यांच्या ताब्यातून दारुचे २३ बॉक्स एक क्रुझर गाडी असा एकूण लाख ५३ हजार रुपयाचा माल जप्त केला. दोन्ही आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरेश चव्हाण, व्ही.एम. पाटील, निलेश देशमुख, नितिन सोळंकी, जी.व्ही. पहाडे, ए.पी. तिवाणे, राजु कुसळकर जी.बी. मोरे यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...