आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरीत्या रेती वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर- तालुक्यातीलपारस येथे विनापरवाना दोन ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या रेती वाहतूक करत असताना बाळापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनासह सहा लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पारस येथील रेल्वे स्टेशन ते पारस टी पाॅइंट दरम्यान अवैधरीत्या दोन ट्रॅक्टरमधून दोन ब्रास रेती किंमत १८ हजार रुपये विनापरवाना वाहतूक करताना ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३०, एबी ५५८१, ट्राॅली क्रमांक एमएच ३० जे २७३५ ट्रॅक्टर क्रमांक एमएच १४ बी, एम ३२८९ ट्राॅली क्रमांक एमटीव्ही ५८०४ किंमत लाख असा एकूण लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गोपाल देविदास दुरळकर, अमोल विठ्ठलराव वारकरी, मंगेश माणिकराव वारकरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.