आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटात दारू जप्त, चौघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शहर पोलिसांच्या नाकाबंदीदरम्यान लोहारी रोड दुरदर्शन केंद्र येथून अवैध देशी दारू वाहन नेणाऱ्या चौघांना डीबी स्क्वाड पथकाने मुद्देमालासह अटक केली. 
 
डीबी स्क्वाड पथकाने सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून लोहारी रोड येथे नाकाबंदी केली असता दुचाकीवरून जात असताना अनिल जानराव तेलगोटे, वय ४५ वर्षे, रा. खानापूर वेस, सुनील तेजराव सिरसाठ, वय २० वर्षे, रा. खानापूर वेस, अकोट यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ३८४ देशी दारू क्वार्टर किंमत ११ हजार ५२० रुपये दुचाकी क्र. एमएच ३० एई ४६१२ किंमत २० हजार असा एकूण ३१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
 
दूरदर्शन केंद्र येथून अवैध देशी दारू वाहून नेणाऱ्या सचिन गजानन तेलगोटे, वय २५ वर्षे, रा. खानापुर वेस, अमोल भीमराव सरकटे, वय २४ वर्षे, रा. देशमुख प्लाट, अकोट याच्याकडून ९६ देशी दारू क्वार्टर किंमत हजार ७६० रुपये दुचाकी गाडी क्र. एमएच ३० व्ही ४६२८ किंमत २० हजार रुपये असा एकूण २५ हजार ७६० रुपयांचा माल जप्त केला. दोन कारवाईत एकूण ५६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केेला. 
 
ही कारवाई पोनि गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ यशवंत शिंदे, पोकॉ जितेंद्र कातखेडे, रोहित तिवारी, राहुल वाघ, वीरेंद्र लाड, पोहेकॉ संजय घायल, पोकॉ गोपाल अघडते, सुल्तान पठाण, विजय सोळंके यांनी केली. 
 
बातम्या आणखी आहेत...