आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने युवकाला चिरडले, अवैध वाहतुकीचा बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शनिवारी सकाळी वाजता रेतीने भरलेल्या टिप्परने चांदूर येथील समाधान वासुदेव पद्मने, वय २९ यांना धडक दिली. त्यात समाधान यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही ह्दयद्रावक घटना कौलखेड चाैकाजवळील दुर्गा लॉन्सच्या कॉर्नरवर घडली. समाधान यांना एक मुलगी आठ महिन्याचा मुलगा आहे. विशेष म्हणजे ट्रकचालकाकडे रेती वाहतुकीची रॉयल्टी नव्हती.
 
समाधान पद्मने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दरराेज सकाळी वाजता चांदूरहून अकोला येथे भाजीपाला घेण्यासाठी निघतात. भाजीपाला घेऊन तोच भाजीपाला गावात विकतात. कमावलेल्या चार पैशातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारची पहाट पद्मने कुटुंबियांसाठी काळी पहाट ठरली. सकाळी ५.३० वाजता समाधान पद्मने हे एमएच ३० एवाय ३८० क्रमांकाच्या कायनॅटिक स्कुटीने अकोल्यासाठी निघाले. ते दुर्गालॉन्सजवळ आल्यानंतर अकोला शहरातून रेतीने भरलेला एम.एच. ०४ डीके ४८०३ क्रमांकाचा टिप्पर भरधाव येत होता.
 
यावेळी टिप्परने म्हाडा कॉलनीकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतल्याने अकोल्याकडे जाणारे समाधान पद्मने टीप्परच्या चाकाखाली आले. यावेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन टिप्पर चालक ज्ञानेश्वर श्रीराम भोंगरे (रा. टाकळी जलंब) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध समाधान यांचे बंधू संतोष यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल केला.
 
समाधान यांना दोन मुले
समाधानपद्मने हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. कोरडवाहू शेती असल्याने दोन एकरात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांना भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. अकोला भाजीमंडीतून भाजी विकत घेऊन गावात ती विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांना एक मुलगी आठ महिन्याचा मुलगा असल्याने आता त्यांच्या कुटुंबाच्या समोर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समाधान यांच्या मृत्यूने चांदूर गावात शोककळा पसरली होती. होतकरू युवकाच्या दु:खाने अनेकांच्या मनाला चटका बसला.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, अवैध रेती वाहतुकीला आहे तरी कुणाचा आर्शीवाद?
बातम्या आणखी आहेत...