आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीमध्ये अधिकारी करताहेत उधळपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातदुष्काळजन्य परिस्थिती असताना जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांनी उधळपट्टी सुरू केल्याचा आरोप सदस्या शोभाताई शेळके चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केला. स्थायी समिती सभेत २९ जुलै रोजी सदस्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबाबत खंत व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात दुपारी वाजता आयोजित बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, महिला बाल कल्याण समिती सभापती द्राैपदाबाई वाहोकार, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती रामदास मालवे, स्थायी समिती सदस्य उंबरकार, भारिप गटनेते विजयकुमार लव्हाळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, शोभाताई शेळके, पुंडलिकराव अरबट, ज्येष्ठ सदस्य दामोदर जगताप आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सदस्या शोभाताई शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांचे कॅबिन चकाचक करण्यावर अधिक भर दिला जात आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कुंभारे यांनी कोणतीही परवानगी घेता नियमबाह्य कामे सुरू केल्याचा आरोप सदस्यांनी केला. यास अधिकाऱ्यांचेसुद्धा पाठबळ मिळत अाहे. जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शेळके, चंद्रशेखर पांडे गुरुजी, विजय लव्हाळे यांनी केला.

महिला,बालकांच्या योजना वाऱ्यावर
महिलाबालकल्याण विभागाला सक्षम अधिकारी नसल्याने या विभागाच्या योजनांची वाट लागली आहे. नागरिकांनी विविध योजनांसाठी अर्ज केले आहेत. मात्र, ते अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन चांगला अधिकारी या विभागाला द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी या वेळी केली.

शिक्षकांचे समायोजन की बदल्या?
शिक्षणविभागाने समायोजनाच्या नावावर बेकायदेशीर जवळच्या शिक्षकांच्या अर्थकारणातून बदल्या केल्या आहेत. मात्र, कागदावर समायोजन दाखवले आहे. या प्रकाराचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

बीडीओ जातात तरी कुठे?
गटविकासअधिकारी हे कोणत्याच सभेला हजर राहत नाही. सभेच्या विषय सूचीतूनही त्यांच्याबाबतचा विषय परस्पर काढला जातो, हे चाललंय तरी काय? असा सवाल भारिप गटनेेते विजयकुुमार लव्हाळे यांनी उपस्थित केला. त्यावर सभेला बीडीओंनी बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत यापूर्वीच पत्र दिले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही िवषय असले तर आम्ही त्यांना फॉरवर्ड करत असतो.

सदस्यांना मिळतेय अपमानास्पद वागणूक
जिल्हापरिषदेत सीईओ राज सुरू असून, सन्माननीय सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक कर्मचाऱ्यांचा विचार करावा, जेणेकरून जिल्हा परिषदेत चांगले वातावरण िनर्माण होईल.