आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम-पेट्रोल पंपांवर गर्दी, निर्णयाने नागरिक चक्रावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे एटीएम, पेट्रोल पंप तत्सम व्यवहाराच्या ठिकाणी मंगळवारी रात्री प्रचंड गर्दी उसळली. एका पेट्रोलपंपचालकाला पोलिस बंदोबस्त घ्यावा लागला, तर दुसरीकडे एटीएमवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठीही पोलिसांना स्वत:हून धाव घ्यावी लागली.
मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील एटीएमसमोर सुमारे ५०० मीटर लांब रांग लागली होती. याठिकाणी पैसे काढणे जमा करणे (कॅश डिपॉझीट मशीन) अशी दोन्ही प्रकारची सोय आहे. तिचा वापर करत प्रत्येकाने ४००-४०० रुपयांचे विड्राॅल करणे सुरु केले होते. येथे पोलिसांना पाचारण करावे लागले. डाबकी रोड, गोरक्षण रोड, जुने शहर, एमजी रोड आदी भागांतील एटीएमवरही जवळपास असेच चित्र होते.

काहींनी पेट्रोल पंपचालकांना नोटा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंपचालकांनी मोठ्या नोटा घेण्यास नकार दिल्याने अशोक वाटिकाजवळील पेट्रोल पंपावर वाद उसळला. तो सोडवण्यासाठी शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान, अशा भानगडी उद््भवू नये म्हणून काही पेट्रोलपंपचालकांनी वेळेपूर्वीच पंप बंद केले.

एटीएममध्ये शंभरच्या नोटांचा ठणठणाट
हजार-पाचशेच्या नोटा चालणार नाहीत, म्हणून स्वत:जवळ शंभर रुपयांच्याच नोटा असल्या पाहिजेत, असा प्रयत्न करत आहे. यामुळे एटीएमवर केवळ याच नोटांचा विड्रॉल केला जात असून नागरिकांच्या अशा प्रयत्नांमुळे एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटांचा ठणठणाट झाला. मध्यरात्रीच्या सुमारास बहुतेक एटीएममधील नोटा संपल्या होत्या.

औषध विक्रेत्यांनीही मागितले चिल्लर
निर्णयाचा धसका औषध व्यवसायिकांनीही घेतला. केडीया प्लॉटमधील औषधी दुकानातून ग्राहकाने १२०० ची औषधी खरेदी केली. पैसे देण्यासाठी त्यांनी हजारांच्या दोन नोटा पुढे केल्या. मात्र रक्कम शंभर रुपयांच्या नोटांमध्ये द्या, असा दुकानदाराचा आग्रह होता. अखेरीस एका नोटेचा स्वीकार करुन २०० ची औषधी कमी करावी लागली.

Ãसध्याच्या काळातमहागाई प्रचंड वाढली आहे. तुलनेने नोकरदारांचे वेतनही अधिक आहे. सर्वच नागरिक एटीएम कार्ड किंवा चेकने व्यवहार करु शकत नाहीत. त्यामुळे हजार, पाचशेच्या नोटांद्वारे व्यवहार करणे सोईचे होते. शासनाला हवेच असेल तर या नोटांची छपाई किंवा इतर बाबी बदलवून त्या चलनात ठेवल्या पाहिजे. छोट्या नोटा हाताळणे फार कठिण आहे.’’ नयनगायकवाड, कामगार प्रतिनिधी, अकोला.

छोट्या नोटा हाताळणे कठिणच
सराफा बाजारही होईल ठप्प

निर्णयामुळे सराफा, धान्य, कापड किराणा बाजार आठवडाभर प्रभावीत होईल. नोटांच्या अदला-बदलीमुळे बँका एटीएम दोन दिवस बंद राहतील. नागरी व्यवहार आठवडाभर पूर्ववत होणार नाही, असे सराफा व्यवसायिकांचे म्हणणे आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटकाही त्यांनाच बसेल, असे एका व्यवसायिकाने स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...