आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्प खर्चाच्या तंत्राची अंमलबजावणी व्हावी; कुलगुरु डॉ. विलास भाले यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या किडींचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंबहुना त्यांची ओळख अल्प खर्चाचे एकात्मिक नियंत्रण तंत्र समजून प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याकामी विद्यापीठांतर्गत सेवारत संबंधितानी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे’, असे आवाहन ‘पंदेकृवि’चे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी केले. 


विद्यापीठाचा कीटकशास्त्र विभाग सहयोगी अधिष्ठाता निम्न कृषी शिक्षण विभागाने आयोजित ‘प्रमुख पिकांवर कीडनाशकांचा शास्त्रशुद्ध वापर’ या विषयावरील कार्यशाळेत ते बाेलत हाेते. कृषि महाविद्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या कार्यशाळेचे उद््घाटन कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, कृषी महाविद्यालय, अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भातील सर्व कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, त्यांचे सहकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे सहकारी, कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक विषयतज्ञ, कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख त्याचे सहकारी यासह विद्यापीठातील सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 


आपल्या दूरध्वनीवरील संदेशात डॉ. भाले यांनी उपस्थितांना कार्यशाळेचे महत्व सांगितले. या कार्यशाळेच्या माध्यमातून विदर्भातील कृषी शाळा, महाविद्यालयातील जवळपास बावीस हजार विद्यार्थी या शास्त्रशुद्ध कीडनाशक वापराचे तंत्रज्ञान आपल्या गावात पोहोचवतील फवारणी दरम्यान होणाऱ्या छोट्या चुका सुधारत अल्प खर्चाचे शाश्वत सुरक्षित नियंत्रण शक्य होईल, असा आयोजनामागील उद्देश डॉ. उंदीरवाडे यांनी प्रास्ताविकात विषद केला. डॉ. खर्चे, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. राजेंद्र गाडे यांनी विचार व्यक्त केले. उद््घाटनानंतर तांत्रिक सत्रात कीटक शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी सादरीकरणाद्वारे एकात्मिक कीड नियंत्रण उपस्थितांना अवगत केले. या मध्ये डॉ. अनिल कोल्हे, डॉ.उपेंद्र कुलकर्णी, डॉ.सुनील भलकारे, डॉ.अनिल कांबळे यांचा समावेश होता. या प्रसंगी संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारताचे संविधान उद्देशिका’ चे सार्वजनिक वाचन करण्यात आले. उद्घाटनसत्राचे सूत्रसंचालन डॉ. अनिल कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ उपेंद्र कुलकर्णी यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...