आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक अतिरिक्त असतानाही ‘प्रगत महाराष्ट्र मोहीम’ का ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : ‘जिल्ह्यातउर्दू माध्यमाचे १२ हजार ३३३ विद्यार्थी असून, शिक्षकांची संख्या ५९१ अाहे. असे असतानाही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिम का राबवावी लागते, असा सवाल उपस्थित करीत एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, यासाठी परिश्रम घ्या,’ असे अावाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे यांनी उर्दू शिक्षकांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत केले.
 
जिल्हाधिकारी कायार्लयातील नियाेजन भवनात झालेल्या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला. कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने अनेक दिवसांपासून नियाेजन केले. 
 
यासाठी संघटनेने शिक्षण विभागाला पत्रही दिले. कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही दिले होते. कार्यशाळेत सहभागी हाेण्यासाठी उर्दू माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना अादेश देण्याचेही पत्रात नमूद करण्यात अाले हाेते. 

दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कार्यशाळेला प्रारंभ झाला. कार्यशाळेला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. गफ्फार,प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक विभागाचे प्रकाश मुकुंद, संघटनेचे विभागीय अध्यक्ष वासिक नवेद उपस्थित होते. सूत्रसंचालन सैय्यद जव्वाद हुसेन यांनी केले. अाभार राजू कुरेशी यांनी केले. 

शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन 
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाजवळ शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन अायाेजित केले अाहे. या प्रदर्शनात प्रगत शैक्षणिक, ई-लर्निंग शैक्षणिक साहित्य साेबत अाणावे, असे यापूर्वीच गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये कळवले हाेते. 

हिवरखेडच्या मुद्यावरही भाष्य 
हिवरखेडच्या जि. प. उर्दू माध्यम शाळेत एकच शिक्षक असल्याच्या मुद्यावरही सीईओ विधळे यांनी कार्यशाळेत भाष्य केले. वेतनाला उशिर झाल्यास शिक्षक निवेदन घेत धाव घेतात, असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींनी शिक्षक नसल्याने जि.प.त धाव घेत निवेदन दिले. होते. 
बातम्या आणखी आहेत...