आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता एेन परिक्षेच्या तोंडावर केल्या शिक्षकांच्या बदल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिक्षकांच्या समायोजनानंतर अतिरिक्त ठरलेल्या १७ शिक्षकांच्या बदल्या एेन परिक्षांच्या तोंडावर केल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या या अफलातून निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान हाेणार अाहे. विशेष म्हणजे दहावी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था असलेल्या महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ लाही यातून वगळले नाही. 
 
दहावीच्या परिक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. तर पहिली ते नववी पर्यंतच्या परिक्षा एप्रिल महिन्यात होतील. विशेष म्हणजे जे १७ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्या शिक्षकांनी शालेय सत्र सुरु झाल्यापासून आता पर्यंत विद्यार्थ्यांना विविध विषय आता पर्यंत शिकवले आहे. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पुढील शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्र परिक्षांचा विचार करता एैन परिक्षांच्या तोंडावर अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तुर्तास महापालिका शिक्षण विभागात नियुक्त करण्यात आले असून पुढे कोणत्या विभागात नियुक्ती केली जाईल, ही बाब अद्याप निश्चित नाही. या प्रकारामुळे मात्र विद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

महापालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मध्ये दहावी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे. शाळेत आठवी, नववी आणि दहावा वर्गाला गणित शिकवण्यासाठी दोन शिक्षक आहेत. यापैकी एका शिक्षिकेची बदली केली. तर दुसरे शिक्षक प्रकृतीमुळे शाळेत कमी येतात. दहावीची परिक्षा मंगळवार पासून सुरु होत असून या शाळेतील दहावीची परिक्षा देणारी ही दुसरी बॅच आहे. पेपरच्या अदल्या दिवशी ज्या विषयाचा पेपर असेल त्या पेपर बाबत संबंधित विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. परंतु आता शिक्षकांच्या बदल्या झाल्याने दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करणार ? असा पेच निर्माण झाला आहे. 
 
इतर संस्थांचे सहकार्य प्रशासनाचे असहकार्य : महापालिकामराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील विद्यार्थ्यासाठी प्रभाग किड्सचे डॉ.गजानन नारे, मायबोली कोचिंग क्लासेसच्या संचालिका सिमा बक्षी, रेडक्रॉस संस्थेचे प्रभजितसिंह बछेर आदी विविध संस्था मदत करीत आहेत. एकीकडे या संस्था शाळेला सहकार्य करीत आहेत तर दुसरीकडे प्रशासन मात्र असहकार्य करीत आहे. 
 
नवनियुक्त नगरसेवकांसमोर आव्हान 
ज्याप्रभागात ही शाळा आहे. त्या प्रभागात चारही नगरसेवक पहिल्यांदाच निवडुन आले आहेत. त्यामुळे शाळेच्या वाढत्या प्रगतीच्या आलेखाला आणि उंचावर नेण्याची जबाबदारी या नवनियुक्त नगरसेवकांवर येऊन पडली आहे. अद्याप या नगरसेवकांचा कार्यकाळ सुरु झालेला नसताना याच शाळेतील चार शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हे बदल्या रोखण्याचे आव्हान हे नगरसेवक पेलतील का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे. 
बातम्या आणखी आहेत...