आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्तगावात युवकाची हत्या, चाकूचा केला वाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - तालुक्यातील राणेगाव जस्तगाव येथील रहिवासी असलेल्या मुकुंद गोपाळ कुकडे या २४ वर्षीय युवकास २१ सप्टेंबर रोजी जस्तगाव शिवारात दुपारी तीन वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने वापरत्या चाकूने बगलेत वार करून जखमी केले. त्यास उपचारार्थ अकोला येथे नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

राणेगाव येथील रहिवासी असलेल्या जनार्दन बाबाराव कुकडे यांच्या मालकीच्या शेतात २१ सप्टेंबर रोजी दुपारी वाजता अज्ञात आरोपीने वापरातील चाकूने वार करून मुकुंद यास जखमी केले. दरम्यान, सचिन भीमराव वानखडे रा. राणेगाव याने मृतकाचे चुलते बाळकृष्ण बाबाराव कुकडे यांना आवाज देऊन बोलावून घेतले. तेव्हा घटनास्थळी मुकुंद रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. जखमी मुकुंद यास उपचारार्थ बाळकृष्ण कुकडे, धम्म रघुनाथ वानखडे, सचिन भीमराव वानखडे यांनी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले. कोणी मारले, असे विचारले असता त्याने कोणाचेही नाव सांगितले नाही. प्राथमिक उपचारानंतर त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. बाळकृष्ण बाबाराव कुकडे यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, तेल्हाराचे ठाणेदार अन्वर म. शेख यांनी भेट दिली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा ठाणेदार अन्वर म. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भस्मे अधिक तपास करत आहेत.