आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ग्रामीण भागाला ‘चलन तुटवड्या’चा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धाड - मोदी सरकारच्या चलन बंदी निर्णयामुळे महिन्याभरापासून बँकाचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आजही शहरासह जिल्ह्यातील बँका एटीएम समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहे. चलन तुटवड्याचा फटका ग्रामीण भागाला बसत असल्याने जनजीवन ढवळून निघाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना चलन तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
नोटबंदीला महिला उलटला तरी सुध्दा जिल्ह्यातील बँका समोरील रांगा कमी होण्याचा नाव घेतांना दिसत नाही. अशा वेळी जिल्हा प्रशासनाने योग्य रित्या नियोजन करुन नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. नोट बंदी नंतर उद्भवलेल्या चलन तुटवड्याचा मोठा त्रास हा ग्रामीण जनतेला सर्वात जास्त सहन करावा लागत आहे. त्यामध्ये ग्रामीण जनजीवन ढवळुन निघत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांनी ग्रामीण भागात आपले जाळे विस्तारीत करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रे दिली. त्यामुळे या ग्राहक सेवा केंद्रात सामान्य नागरिकांनी खाते उघडले. ज्यात लहान शेतकरी, जनधन खाते, संजय गांधी निराधार, ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिकांचे खाते असून जिल्ह्यात लगभग हजार ४१९ गावांसाठी विविध बँकांचे ग्राहक सेवा केंद्र कार्यरत असून त्या द्वारे ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बँक नाही बँकांसाठी ग्रामीण जनतेला शहराकडे जावे लागत होते. त्या ठिकाणी ही ग्राहक सेवा केंद्र सेवा देत आहे. नोट बंदीच्या नंतर या ग्राहक सेवा केंद्राचा कारभार ठप्प झाल्याचे दिसत आहे. नोट बंदीमुळे मुख्य बँकांकडून ग्राहक सेवा केंद्र चालकांना पैसाच दिला. जात नसल्याने सेवा केंद्र बंद पडलेले आहे.चलन तुटवड्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी इतर जिल्ह्यात नियोजनाद्वारे विविध माध्यमे वापरुन नागरिकांना दिलासा देण्यात येत असतांना जिल्ह्यात मात्र असे काही होतांना दिसत नाही. नोट बंदीतून निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावर इतर ठिकाणी वाणिज्य दुतांमार्फत चालती बोलती बँकींग ही संकल्पना राबवण्यात येत असून त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक समस्येवर तोडगा काढतांना दिसत आहे. २० हजारांच्या मर्यादेत वाणिज्य दूतांमार्फत ग्रामीण नागरिकांना रक्कम बँकेतुन काढता भरता येत असल्याने चलन तुटवड्याच्या काळात दिलासा मिळत आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या नियोजनातुन १५५३ गावातील नागरिकांना ही सुविधा राष्ट्रीयकृत बँकांच्या वाणिज्य दुतांच्या माध्यमातून देणे सुरु आहे. ही योजना जिल्हा प्रशासनाने नियोजन करुन राबविल्यास ग्रामीण जनतेला दिलासा मिळु शकतो. त्यामुळे वाणिज्य दुत योजना राबवण्याची याच सोबत ग्राहक सेवा केंद्राचा व्यवहार सुरु करण्याची मागणी ग्रामीण जनता करीत आहे.

जिल्ह्यात ४४१ ग्राहक सेवा केंद्र
बँक ऑफ बरोडा १, बँक ऑफ इंडिया १, बँक ऑफ महाराष्ट्र ५९, सेंट्रल ऑफ इंडिया ४६, देना बँक १, आयडीबीआय बँक ४, इंडियन ओव्हरसिस बँक ५, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स १, पंजाब नॅशनल बँक २, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद १, स्टेट बँक ऑफ इंडिया २५०, सिंडीकेट बँक ३, युको बँक २, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ६५

चलन तुटवड्याची कोंडी सोडवण्यासाठी वाणिज्य दूत संकल्पना
-नोट बंदीच्यानिर्णयानंतर अचानक आर्थिक तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यामुळे बँका वरही मोठा भार जानवु लागला आहे. भार कमी करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रासाेबत वाणिज्य दुत ही संकल्पना दिलासा देणारी ठरु शकते.’
’ जी.एन. स्त्रोते, सहाय्यक प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, बुलडाणा

सर्वात जास्त ग्राहक सेवा केंद्र
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्राहक सेवा केंद्राचे जाळे असुन यात सर्वात जास्त संख्या ही भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राची आहे. याच प्रमाणे जिल्ह्यात शाखा सुध्दा स्टेट बँकेच्या आहे. तर जिल्ह्याची चलन पुरवठादार सुध्दा स्टेट बँक आहे. त्यामुळे चलन प्राप्त झाल्यावर सर्वात जास्त रोकड स्टेट बँक शाखांमध्ये पुरवठा करण्यात येत आहे. तर इतर बँकांना मात्र मर्यादित स्वरुपाचा चलन पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांमध्ये चलन वाटपात कमी अधिक दिसुन येत आहे.
बातम्या आणखी आहेत...