आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेदारांसह पोलिसांची पोलिस कोठडी वाढवली, लाचखोरीचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अकोला जीआरपीचे ठाणेदारांसह चार पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांकडून हप्त्यापोटी साडेसहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या ठाणेदार राजकुमार वानखडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल गौतम शिरसाट, सुनिल कडू शरद जुनघरे यांच्याविरुद्ध एसीबीकडे फेरीवाल्याने तक्रार केली होती. त्यावरून शुक्रवारी एसीबीने सापळा रचला होता. यावेळी पोलिस कर्मचा ऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली त्याचे वाटप करत असताना त्यांना पकडण्यात आले. ठाणेदारासह पाचही पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपींची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्यामुळे त्यांना एसीबीने पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत दिवसांची वाढ केली आहे. देतनाही प्रश्नांची उत्तरे : आरोपीविचारलेल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. त्यांना त्यांचे गाड्यांचे नंबरही आठवत नाहीत. म्हणून आरोपींना प्रश्नावली करून दिली. त्यातही हो किंवा नाही यासारखे उत्तरही ते देत नाहीत. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी. अशी मागणी एसीबीने न्यायालयाला केली.आरोपीच्या वतीने विरोध करण्यात आला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ऑगस्टपर्यंत आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. आरोपींच्या वतीने अॅड. साहेबराव वानखडे, प्रदीप हातेकर, अॅड. केशव एच. गिरी वैशाली गिरी भारती यांनी बाजू मांडली.

तपासात असहकार्य
तपासात आरोपी सहकार्य करीत नाहीत. गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करायच्या आहेत. या मागणीसाठी एसीबीने न्यायालयात आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर आरोपींच्या वतीने पोलिस कोठडीला जोरदार विरोध करण्यात आला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.

न्यायालय परिसरात मोठी गर्दी
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार अशी माहिती आरोपींच्या समर्थकांना होती. त्यानुसार त्यांनी न्यायालयाच्या आवारात आरोपींना भेटण्यासाठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता.

जीआरपी आरपीएफ या रेल्वे स्थानकावरील दोन स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही सुरक्षा यंत्रणांमध्ये वाद आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरपीएफकडून कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम जीआरपी करते. मात्र या कामाचे श्रेय जीआरपीलाच जात असल्याची सल आरपीएफच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही फेरीवाल्यांना उसकून दिल्याचे दबक्या आवाजात रेल्वेस्थानक परिसरात बोलल्या जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...