आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांत वाढ; लहान मुले, वयोवृद्ध त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - मागील काही दिवसांपासून अचानक वातावरणात बदल झाल्याने शहरासह परिसरात बोचऱ्या थंडीने सुरूवात केली आहे. या थंडीचा सर्वात फटका लहान मुले वयोवृद्धांना बसत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लहान थोर मंडळीनी मफलर, स्वेटर, रुमाल आदींचा सहारा घेतला आहे. तर काही जण शेकोट्या पेटून थंडी पासून बचाव करीत आहेत. तरीही अचानक वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे. 

 

बुलडाणा शहर हे संपूर्ण राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या छोट्याशा शहराला इंग्रजांनी जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. थंड शांत वातावरण असल्यामुळे परजिल्ह्यातील असंख्य कर्मचारी शहरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दिवसागणीक शहराचा पसारा वाढत आहे. दरम्यान मागील काही दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे बोचऱ्या थंडीला सुरूवात झाली आहे. सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यत हवेत गारवा राहात आहे. या थंडीचा सर्वाधिक त्रास लहान मुले, वयोवृद्ध नागरिक सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अडगळीत पडलेले गरम कपडे काढण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक जण मफलर, टोपी, स्वेटर, जाकीट, रुमाल आदी गरम कपड्याचा वापर करतांना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे याच थंडीमुळे विविध आजारामध्ये वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला या आजाराने अनेकांना ग्रासून टाकले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झालेले दिसून येत आहेत. 

 

थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेेकोट्या पेटविण्यात येत आहेत. सकाळीच कुडकुडत शाळेत जाणारे विद्यार्थी स्वेटर टोपी घालून जात आहेत. या बोचऱ्या थंडीमुळे मॉर्निग वॉक करणाऱ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. 


रब्बी पिकाला फायदा 
मागील काही दिवसापासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. या थंडीचा सर्वाधिक फायदा रब्बी पिकाला होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...