आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या तक्रारींमुळे रोजगार हमी योजना सापडली वांध्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळून त्यांचे स्थलांतर थांबावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेतील पन्नास टक्के काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर उर्वरित कामे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिंचन विभाग, कृषी अधिकारी, वन विभाग या यंत्रणेमार्फत करण्यात येतात. या योजनेंतर्गत ग्रामंपचायतीच्या माध्यमातून शेत रस्ता, सिंचन विहिरी, गावातील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण यासह इतर कामे करण्यात येतात. परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त ग्रामपंचायतीच्याच कामाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ही योजना राबविणे ग्रामपंचायतींना अवघड झाले आहे. काही ग्रामपंचायतींनी तर नको भानगड म्हणून या योजनेकडे पाठ फिरवली आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत वगळता इतर यंत्रणेकडून रोहयोची कामे करण्यात येतात. परंतु त्याची पाहिजे तशा तक्रारी करण्यात येत नाही. फक्त ग्रामंपचायतींना टार्गेट केल्या जात आहे.

ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या रोहयो कामाच्या असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत. यासाठी संबंधित ग्रामसेवक सरपंचास जबाबदार धरण्यात येत आहे. कामे सोडून ग्रामसेवकाच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करावी, या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार टाकला आहे.
बातम्या आणखी आहेत...