आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये वर्षागणिक वाढताहेत हत्तीरोगाचे रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जिल्ह्यात हत्तीरोगाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये २०१५-१६ मध्ये ३२ रुग्ण आढळले आहेत. खामगाव तालुक्यात हत्तीरोगाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमाअंतर्गत १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम राबवली जाते. यामध्ये रुग्णांच्या रक्ताची तपासणी करुन हत्तीरोग आढळल्यस त्यावर आवश्यक ते औषधोपचार केल्या जातात. हा रोग वर्षागणीक जिल्ह्यात वाढत असल्याची आकडेवारी असून २००८-०९ पासून २०१६ पर्यंतच्या दिलेल्या माहितीमध्ये वर्षागणीक हा आजार बळावत आहे.

ही आहेत हत्ती रोगाची लक्षणे-
क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावल्यानंतर होणाऱ्या या हत्तीरोगाचे दोन प्रकार असून यामध्ये एक अंडीवृद्धी आणि दुसरा रुग्णाचे हत्ती सारखे गुडघ्यापासून पाय सुजतात. हत्तीरोग हा एकदम होत नसल्याने अगोदर पायाचा काही भाग सुजतो. हा रोग झाल्याने मनुष्य मरत नाही. परंतु त्याला कायमचे अपंगत्व येते, एवढे मात्र निश्चित.

हत्तीरोगदिनामध्ये झाला बदल :
हत्तीरोगजागतिक दिन हा काही दिवसांपूर्वी ऑगस्ट रोजी पाळल्या जात होता. परंतु गतवर्षीपासून हा दिवस जून करण्यात आला आहे. हत्तीरोगाची काळजी घेण्यात यावी. हा राेग पाय पसरणार नाही. यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली दिसून येत आहे. त्याला प्रतिसाद हवा आहे.

रुग्णांचे रात्रीच घ्यावे लागतात रक्त नमुने
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात हत्तीरोग रुग्ण शोध माेहिम राबवली जाते. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोग रुग्णाच्या रक्ताची तपासणी करावी लागते. ही रक्त तपासणी वेगळीच करण्यात येते. कारण या रोगाचे जंतू दिवसा जॉईटच्या ठिकाणी अडकून राहतात आणि रात्रीच्या वेळी रक्तात संक्रमण करतात. रात्रीच रुग्णांची रक्त तपासणी करावी लागते.

परिसर स्वच्छ ठेवा
क्युलेक्सनावाच्या डासाच्या मादीपासून हत्तीरोग होतो, ही मादी केवळ घाण साचलेल्या सांडपाण्यातच असते. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवून या रोगापासून बचाव करावा तर हातापायावर कोठेही सुज आल्यास जिल्हा हिवताप कार्यालयात तपासून निदान करुन घ्यावे. एस.के. वानखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा.
बातम्या आणखी आहेत...