आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतील वाढती गुन्हेगारी नष्ट करणार- सिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेस्थानकाची पाहणी करताना महानिरीक्षक ए. के. सिंग. - Divya Marathi
रेल्वेस्थानकाची पाहणी करताना महानिरीक्षक ए. के. सिंग.
अकोला- रेल्वेतीलवाढती गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल प्रयत्नशील आहे. आरपीएफमधील रिक्त जागा भरण्याचे कामसुद्धा सुरू आहे. कुंभमेळ्यानंतर विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर आरपीएफच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तसेच रात्रीची गस्त वाढवण्यात येणार आहे. आता अकोला रेल्वेस्थानक समस्यामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती मध्य रेल्वेचे आरपीएफचे महानिरीक्षक ए. के. सिंग यांनी दिली. मंगळवारी ते "दिव्य मराठी'शी बोलत होते.
प्रत्येक रेल्वेस्थानक एका मोठ्या अधिकाऱ्याला निरीक्षणासाठी आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी (जीएम) दत्तक दिले आहे. त्यानुसार अकोला रेल्वेस्थानक आरपीएफचे महानिरीक्षक ए. के. सिंग यांच्याकडे आले आहे. यापुढे नियमितपणे ते अकोला रेल्वेस्थानकाला भेट देणार असून, येथील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी ए. के. सिंग म्हणाले की, रेल्वेच्या सुरक्षेला आरपीएफचे प्राधान्य राहील.

अकोला रेल्वेस्थानकावर लवकरच प्रवाशांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच रेल्वेस्थानकावर प्राध्यान्यक्रमाने स्वच्छता राखल्या जाईल. या वेळी त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच सर्वच फलाट, पार्सल विभाग, तिकीट बुकिंग, हॉकर्स, कँटिन, पार्किंग व्यवस्था आणि विश्रामगृहाची त्यांनी पाहणी केली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी स्टेशन प्रबंधक, पार्सल विभागप्रमुख, जीआरपीचे पोलिस निरीक्षक डी. बी. सरप, आरपीएफचे निरीक्षक राजेश बढे, आरपीएफचे उपनिरीक्षक अंबरीश बेहरा यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

सुरक्षेला देणार प्राध्यान्य
प्रवाशांच्यासुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची गय सहन करणार नाही. अकोला आरपीएफच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विभागातील अनेक गाड्यांमध्ये रात्रीची गस्त वाढवली आहे. त्यामुळे रेल्वेतील गुन्हेगारीवर बऱ्याचअंशी नियंत्रण आले आहे. येथील सुरक्षेविषयी जर तक्रारी, सूचना असतील तर कळवाव्या. चंद्रमोहनमिश्र, आरपीएफ आयुक्त.