आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी शाळा परिसरात वृक्षारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- यंदाच्या पावसाळ्यात शाळा, महाविद्यालये विद्यापीठांच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्याचा विचार १५ जूनच्या सभेत करण्यात आला होता. आता त्यानुसार वित्त, नियोजन वनमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकंदर ६७ हजार ३०७ शाळांच्या परिसरात पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

जागतिक तापमानातील वाढ, हवामानातील बदल याची तीव्रता कमी करण्यासाठी वनक्षेत्र वृक्षाच्छादन वाढवण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी, तरुणांना वृक्षारोपणाचे महत्त्व अवगत करून त्यांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी नवीन योजना आखण्यात आली आहे. राज्यात एकंदर ९६ हजार १७९ प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकंदर ६७ हजार ३०७ शाळा आहेत. पहिल्या टप्प्यात योजनेची अंमलबजावणी योग्यरीतीने होण्यासाठी केवळ स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका आदी शाळांमध्ये वृक्षारोपण योजना राबवण्यात येईल.

जि.प. प्रत्येक शाळेस २० रोपांचे देणार पॅकेज
वृक्षारोपणानंतर शाळेने करावे वर्षेे संरक्षण
झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण ठेवावे ८० टक्के
शाळांनी आगाऊ मागणी नोंदवावी
१५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याकरिता शाळा परिसरात मोकळ्या जागेची निवड करून योग्य पद्धतीने खड्डे तयार करण्याची गरज आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडे उपलब्ध रोपांची संख्या पाहता शाळांनी त्यांची गरज, आवडीनुसार रोपांची आगाऊ नोंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही.'' गोविंदपांडे, सामाजिक वनीकरण विभाग.
आता शाळांमध्ये पर्यावरण रक्षक सेना
केंद्रशासनाच्या राष्ट्रीय हरित सेना शाळांच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत किमान १० विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गट ‘पर्यावरण रक्षक सेना’ म्हणून तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक गटप्रमुख राहील. राज्यातील अशा विद्यार्थ्यांची नावे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने सॉफ्टवेअर विकसित करावे, असे योजनेत सुचवले आहे. या विद्यार्थ्यांना वनसंपदा, पर्यावरण रक्षणाचे संवर्धनाबाबत प्रशिक्षित आणि प्रोत्साहित करावे.
बातम्या आणखी आहेत...