आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा वर्ल्ड रेकाॅर्ड भारतीयानेच मोडावा: विष्णु मनोहरांची इच्छा; पत्रकारांसोबत व्यक्त केल्या आपल्या भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेकॉर्डनंतर जल्लोष करताना विष्णू मनोहर. - Divya Marathi
रेकॉर्डनंतर जल्लोष करताना विष्णू मनोहर.
नागपूर- सलग ५३ तास खाद्यपदार्थ तयार करण्याचा विश्व विक्रम मी केला. माझा विश्व विक्रम इतर कोणी मोडण्यापेक्षा एखाद्या भारतीयानेच मोडावा, अशी माझी ईच्छा आहे. भारतीयाने माझा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडल्यानंतर मी पुन्हा नवा वर्ल्ड रेकाॅर्ड करीन असा आत्मविश्वास सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
माझा रेकाॅर्ड एखाद्या भारतीयाने मोडावा अशी माझी ईच्छा आहे. तुषार विघ्ने म्हणून माझा रेल्वेत एक मित्र आहे. त्याचा मुलगा सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला आहे. त्याने माझा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडण्याचा संकल्प केला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तो हाॅटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करणार आहे. आई-वडिलांकडून त्याने माझा विक्रम मोडण्याची परवानगीही घेतली आहे, असे मनोहर यांनी सांगितले. 
 
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस् यांचे निकष खूपच कडक आहे. सहजा सहजी ते कोणाला परवानगी देत नाही. सुरूवातीला मला दोनदा परवानगी नाकारली. पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी परवानगी दिली. त्या नंतर लाँगेस्ट कुकींग मॅरेथाॅनचा विक्रम करायचे ठरवले. त्या नंतर दोनदा ४०-४० तास सराव केला. सर्वांनी नागपुरात तिसऱ्यांदा सराव करायचा आग्रह धरला. पुन्हा सलग चाळीस तास सर्व खाद्य पदार्थ करायचे म्हणजे नाही म्हटले तरी थोडेसे जीवावर आले होते. आणि पहिल्या दोन सरावातून आत्मविश्वास आला होता. त्यामुळे तिसऱ्यांदा सराव करण्यास चक्क नकार दिला. जमलेल्या रसिकांची माफी मागितली, असे मनोहर यांनी सांगितले. वर्ल्ड रेकाॅर्ड झाल्यानंतर लगेच खूप झोपलो नाही. नेहमीसारखाच पहाटे पाच वाजता जागा झालो. आणि चहा करून आई-वडिलांसोबत चहा घेतला. दोन दिवसांनंतर पाच तासांची झोप घेतली, असे यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोहर म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...