आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार, सिंदखेडराजा मार्गावरील घटना, दोन जण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
सिंदखेडराजा - भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोर असलेल्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज १० मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेहकर ते सिंदखेडराजा मार्गावरील तढेगाव फाट्यानजीक घडली. 
 
सैनिक दलात कार्यरत असलेले सुट्टीवर आलेले सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा येथील शिवदास शेषराव म्हस्के हे पत्नी पुष्पा पुतण्या दीपक शिवराज म्हस्के यांना घेऊन एम. एच. २८/ २५६५ या क्रमांकाच्या दुचाकीने राहेरीकडे जात होते. प्रवासात तढेगाव फाटा राहेरी पुला दरम्यान नामांतर मोर्चा स्मृती स्तंभानजीक असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या एम. एच. १६ / सी.ए./ १३१३ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात पुष्पा शिवदास म्हस्के वय ३५ ह्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत झाला. तर त्यांचे पती शिवदास शेषराव म्हस्के वय ४२ दीपक शिवराज म्हस्के वय २२ हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बारलिंगा येथील गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत घटनास्थळ गाठले आणि या अपघातामध्ये गंभीर जखमी असलेल्या शिवदास म्हस्के यांना उपचारासाठी जालना येथील संतकृपा हॉस्पिटल मध्ये हलविले. तर दीपक म्हस्के हा किरकोळ जखमी असल्याने प्रथमोपचारानंतर त्यास सुटी देण्यात आली आहे. 
 
दरम्यान अपघात घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी शिवानंद म्हस्के यांच्या तक्रारीवरुन किनगावराजा पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. गेल्या काही दिवसापासूनच या मार्गावर वाहतूक सुरू झाली. 
 
मदतीसाठी धावले 
घटनेची माहिती मिळताच बारलिंगा येथील सुधाकर नागरे, उमेश डोईफोडे, शरद नागरे, देवानंद डोईफोडे, सुभाष नागरे, सतीश कुटे, प्रथम म्हस्के, अनिल बोर्डे, प्रकाश म्हस्के आदींनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी असलेल्या शिवदास म्हस्के यांना उपचारासाठी जालना येथील संतकृपा हॉस्पिटलमध्ये हलवले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, भरधाव ट्रकच्या धडकेने कारचा चुराडा, 1 जखमी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...