आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाचे लैंगिक शोषण : माजी संस्‍थाध्‍यक्ष, सचिवावर अकोल्‍यात गुन्‍हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून विवाहित युवकाचे लैंगिक शोषण केल्‍याचा आरोप असलेला भारतीय सेवा सदन संस्थेचा माजी अध्यक्ष नीरंजनकुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंठा यांच्‍याविरुद्ध आज (मंगळवारी) सि‍व्हिल लाइन पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला आहे. या बाबत पीडित युवकानेच स्टिंग ऑपरेशन केले होते. शिवाय सोमवारी पत्रकार घेऊन माध्‍यमांना छायाचित्र आणि व्‍हीडीओ क्लिपही दाखवल्‍या.
असे आहे प्रकरण
शहरातील डाबकी रोडवर राहणारा राजू (बदलेले नाव ) हा २७ वर्षीय युवक २००७ पासून
राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात मुलींचे वसतीगृ‍ह आणि बागेत रोजंदारीवर काम करतो. नोकरीत कायम करण्‍याचे, आमिष दाखवून माजी संस्‍थाध्‍यक्ष आणि माजी सचिवाने त्‍याचे वेळोवेळी लैंगिक शोषण केल्‍याचा आरोप त्‍याने केला. शिवाय याची चित्रफ‍ित काढली. त्याने पत्रकारांना दाखवलेल्या व्हिडिओमध्ये युवकाचे लैंगिक शोषण होत असल्याचे दिसते. हे अनैसर्गिक कृत्य रात्रीच्या सुमारास नियमितपणे संस्थेच्या क्वॉर्टरमध्ये केले जात असल्‍याचा आरोपही त्‍याने केला.

संस्थेकडून 'नो रिप्लाय'
याप्रकरणी संस्था आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.