आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लासेसमध्ये अवमानकारक लिखाण, दोषींवर कारवाईसाठी पोलिस ठाण्यात धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहरनगरमधील देवी-देवतांच्या नावाने असलेल्या एका शिकवणी वर्गामध्ये भिंतीवर महापुरुषांविषयी अवमानकारक लिखाण केलेले आढळून आले. त्यावरून काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला.

या शिकवणी वर्गामध्ये रविवारी सकाळी विद्यार्थी पोहोचले. त्यांना भिंतीवर महापुरुषांविषयी आणि देशाविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलेला आढळून आला. त्यावरून काही विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी ही बाब शिकवणी संचालक यांच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर शहरातील भाविक भक्तांनी थेट शिकवणी वर्ग गाठून शिकवणी संचालक यांना धारेवर धरले.

शिकवणी वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अाहेत. त्यात हा प्रकार कुणी केला याविषयी संचालकांना विचारणा केली. मात्र, संचालकांनी सायंकाळी बघतो आणि सांगतो, अशी भूमिका घेतल्यामुळे उपस्थित संतप्त झाले होते.

या वेळी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि भिंतीवरील मजकूर मिटवला. मात्र, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अवमानकारक लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले होते. भाविक भक्तांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलिस ठाण्यात घेतली धाव घेतली हाेती.