आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी बँकांनी जुन्या नोटा भरण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे खाते होल्डवर ठेवण्याचा लावला सपाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - केंद्रशासनाने नोव्हेंबर पासुन एक हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याच निर्णयाचा फायदा सरकारी बँका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरकारी बँकांनी पाचशे हजार रुपयांचा नोटा भरण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे खाते होल्डवर ठेवण्याचा सपाटा लावला आहे. मोताळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकरी वर्गाचे खाते होल्ड केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक देवाण करतांना अडचणी निर्माण होत आहे. परिणामी शेतकरी वर्गात बँक प्रशासना विषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहेे.
शासनाच्या पाचशे हजार रुपयांच्या नोटा चलनातुन बाद करण्याच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मागील काही वर्षापासुन होत असलेली सततची नापिकी, कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

अपेक्षित उत्पादन झाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अशा स्थितीत यावर्षी पीक समाधानकारक असले तरी पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्याच्या मागचा कर्जाचा डोंगर कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामध्ये अजून भर टाकत सरकारी बँकांनी पाचशे हजार रुपयांच्या नोटा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते होल्ड ठेवणे सुरु केले आहे. मोताळा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे. त्या शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहे. यामुळे प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली दिसुन येत आहे. पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा माल घरातच पडुन आहे. दरम्यान आर्थिक तंगी भागविण्यासाठी काही प्रमाणात बाजार समितीमध्ये माल विकायला आणल्यावर चेकद्वारे किंवा हजार, पाचशेच्या नोटांमध्ये रक्कम घ्यावी लागत आहे. यासाठी बँकेचा आधार घ्यावा लागत असल्याने बँक प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली असली तरी विड्रॉल करण्यासाठी गेले असता खाते होल्ड केले असल्याचे सांगण्यात येत आहे. रब्बीचा हंगाम सुरु असतांना शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सदर प्रकाराला शेतकरी कमालीचा त्रासला आहे.

कर्ज भरल्यानंतर व्यवहार पुर्ववत करण्यात येतील
-ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन कर्जाची परतफेड केली नाही. त्यांचे खाते होल्ड करण्यात आले आहे. कर्जाची परतफेड करताच संपुर्ण व्यवहार पुर्ववत करण्यात येतील.
अजयएडगावकर, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मोताळा.
बातम्या आणखी आहेत...