आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सहभागाने मिटेल संवेदनशीलतेचा शिक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहराला चिकटलेला संवेदनशील शहराचा शिक्का पुसून काढण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिले जाणारे उत्कृष्ट गणेश मंडळांचे पुरस्कार मंगळवारी हॉटेल ग्रीनलँड कॉटेजमध्ये वितरित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष माजी गुलाबराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार हरिदास भदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, राकाँचे शहराध्यक्ष अजय तापडिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार बबनराव पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके प्रामुख्याने उपस्थित होते. गुलाबराव गावंडे यांनी विसर्जन मिरवणुकीची शिस्त पाळण्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता यांनी केले. संचालन सिद्धार्थ शर्मा विजय तिवारी यांनी केले. हरिश आलीमचंदानी, अॅड. सुभाष ठाकूर, नीरज शाह, विनोद मानवानी, मनोहर पंजवानी, संतोष पांडे, रवि काळे, चिक्की ठाकूर, अॅड. अशोक शर्मा, मनोज साहू आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.

मुलींना शालेय साहित्य
अनिकट परिसरातील हनुमान गणेशोत्सव मंडळातर्फे दोन विद्यार्थीनींना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत गुलाबराव गावंडे यांनी शालेय साहित्य गणवेश दिले. बेटी बचाव-बेटी पढाव अभियानानुसार ही कृती केल्याचे मंडळाचे अध्यक्ष संतोष पांडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

डझनभर मंडळांना पुरस्कार
यावेळी कमलाबाई खेतान, गोदावरीबाई मोहता, कृष्णाबाई ठाकूर, गणपतलाल खंडेलवाल, परिमलदास पंजवानी मंगेशभाऊ गावंडे यांच्या स्मृत्यर्थ प्रत्येकी दोन याप्रमाणे डझनभर पुरस्कार देण्यात आले. हा बहुमान राज राजेश्वर, तेलीपुरा, जुना धान्य बाजार, देवरावबाबा, भक्ती, जुना कापडबाजार, श्री संत गजानन महाराज, नवयुवक, प्रगती, युवा, रामभरोसे श्री स्वराज्य गणेशोत्सव मंडळांना मिळाला. मंडळ पदाधिकाऱ्यांना चषक रोख रक्कम देण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्तपालन, आकर्षक देखावा, गोरक्षण, धर्मरक्षणाची सारखी बोधप्रद शिकवण आदी निकषांवर हे पुरस्कार दिल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...