आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिठाईचा गाेडवा ठरताेय , अन्न औषधी प्रशासनाचा कारवाईशून्य कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सणउत्सवांच्या सेलिब्रेशनमध्ये मिठाईला माेठे महत्त्व अाहे. त्यामुळे अाता दसरा, दिवाळीसाठी मिठाईची दुकाने सजली अाहेत. मात्र, काही दुकानदार कमाईसाठी मिठाईत हलक्या दर्जाचे साहित्य वापरून ग्राहकांच्या जीवाशी खेळत अाहेत. स्वीट मार्टमधील पदार्थ खाण्यात अाल्याने लहान मुलांना कावीळ, हगवण यांसारखे आजार झाले अाहे. या प्रकाराबाबत माहिती असूनही अन्न औषधी प्रशासन विभागाकडून एकाही स्वीट मार्टची तपासणी करण्यात आली नाही.

दसरा, दिवाळीत सणाचा गोडवा वाढावा यासाठी मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या संधीचा फायदा घेत काही हॉटेल व्यावसायिक खवा विक्रेते तगड्या कमाईसाठी निकृष्ट दर्जाची मिठाई खव्याची विक्री करतात. गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान अन्न औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. एम. कोलते यांच्या मार्गदर्शनात मोहीम उभारून खवा विक्रेेते हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, ते दीर्घ आजारी रजेवर असल्याने अन्न औषध प्रशासनाचा कारभार कोलमडला आहे.

तत्काळ तक्रार करा
आतापर्यंतजिल्ह्यातील विविध ठिकाणांहून २६ नमुने घेण्यात आले आहेत. कोणत्याही दुकानदाराने किंवा हॉटेल व्यावसायिकाने निकृष्ट दर्जाची मिठाई देण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ तक्रार करा. कारवाई करू नि.म. नवलकार, सहायक आयुक्त, अन्न औषधी प्रशासन

खव्यातही भेसळ
बसस्थानक,रेल्वेस्थानक परिसरात सकाळी ते ११ वाजेपर्यंत खवा विकणारे बसलेले दिसतात. या खव्याचाही नमुना घेऊन त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याची तपासणी करणेही गरजेचे अाहे.

लहान मुलांच्या आराेग्याला बाधा
^उघड्यावरीलमिठाई खाद्यपदार्थ खाण्यात आल्यास लहान मुलांना टायफाॅइड, हगवण, कावीळसारखे आजार होऊ शकतात. विविध प्रकारच्या केमिकल्सचा परिणाम आरोग्यावर होऊन अॅलर्जी उद्भवू शकते. स्वच्छतेचा अभाव असल्याने बाळांना इन्फेक्शन होऊ शकते. आनंदपांडव, बालरोग तज्ज्ञ.

मिश्रित मिठाईची विक्री
शहरातीलस्वीट मार्टमधून रवा बेसनमिश्रित मिठाईची विक्री होत आहे, तर रस्त्याच्या कडेला दुकान थाटून छोट्या व्यावसायिकांकडून नागरिकांना निकृष्ट दर्जाची मिठाई विकल्या जात आहे. या मिठाईमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.