आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा अायुक्तांवर फाैजदारी कारवाई, शाेषखड्ड्यांनी घेतला चिमुकल्यांचा जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी तयार केलेल्या शाेषखड्ड्यातील पाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याप्रकरणी साेमवारी मनपा अायुक्त, अभियंता, कंत्राटदार स्वयंसेवी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला. थेट अायुक्तांविरुद्ध फाैजदारी कारवाई झाल्याने खळबळ उडाली अाहे. मुलांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी अादर्श काॅलनीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ मधील मैदानात घडली हाेती. या दुर्घटनेत सिद्धार्थ राजेश धनगावकर कृष्णा राकेश बहेल हे मृत्युमुखी पडले हाेते.

मनपा शाळा क्रमांक १६ समाेर असलेल्या मैदानात मे महिन्यात रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी शाेषखड्डे तयार केले होते. हे खड्डे पूर्णपणे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात साचले. दरम्यान, रविवारी दुपारी खंडेलवाल लाॅन्स परिसरातील वसाहतीमध्ये राहणारे सिद्धार्थ धनगावकर कृष्णा बहेल हे मैदानात पाेहाेचले. या पाण्यात दाेन्ही चिमुलकले पडले. मात्र, खड्ड्यांमध्ये गाळ इतर बांधकाम साहित्य असल्याने ते फसले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेऊन िचमुकल्यांना सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले हाेते.

‘दिशा’सभेतहीझाली चर्चा : शाेषखड्ड्यातीलपाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याची चर्चा मंगळवारी जिल्हाधिकारीकार्यालयात झालेल्या जिल्हा विकास समन्वयक संनियंत्रण समितीच्या (दिशा) सभेतही चर्चा झाली. अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर यांनी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगितले. मुलांच्या कुटुंबीयांना काेणत्या याेजनेतून मदत करता येईल काय, अशी विचारणा अामदार शर्मा यांनी जिल्हाधिकरी जी. श्रीकांत यांना केली. यावर मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देता येईल, असे सांगितले. अर्धवट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना चाप लावणे अावश्यक असल्याचेही सभेत काहींनी व्यक्त केले. सभेला खासदार संजय धाेत्रे, मनपा अायुक्त अजय लहाने प्रामुख्याने उपस्थित हाेते.

चाैकशीलाप्रारंभ : शाेषखड्ड्यातीलपाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याप्रकरणी मंगळवारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी चाैकशीला प्रारंभ केला. एसडीअाे खडसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणीदेखील केली. एसडीअाेंच्या पथकाने मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका, परिसरातील नागरिक, व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांचे जबाबदही नाेंदवले. त्यानंतर त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. लवकरच मनपाचे झाेन अधिकारी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांचाही जबाब नाेंदवण्यात येणार अाहे. पुढील अाठवड्यात जिल्ह्याधिकाऱ्यांना चाैकशी अहवाल सादर हाेण्याची शक्यता अाहे.
तपासात निष्पन्न होणार
याघटनेत कुणाकुणाचा सहभाग आहे. हे तपासात निष्पन्न होणार आहे. त्यानंतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.- छगनराव इंगळे, ठाणेदार खदान पोलिस ठाणे

घडलेली दुर्घटना वेदनादायीच
दुर्घटनाही वेदनादायीच आहे. आम्ही खड्डा खोदला नाही. नगरसेवकांकरवी महापालिकेचा जेसीबी वापरण्यात आला हे मात्र खरे आहे. पण दुर्घटना घडावी हा कुणाचाही उद्देश नसू शकतो. पोलिस त्यांचे काम करत आहे. त्यात निष्पन्न होणार आहे. -अजय लहाने, आयुक्त महापालिक
मनपा शाळा क्रमांक १६ च्या मैदानात असलेले हेच ते खड्डे.

गुन्हा सिद्ध झाल्यास वर्षांचा कारावास
महापालिका आयुक्त यांच्यासह चौघांवर ३०४ कलमानुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याचा आरोप अाहे. त्यानुसार आयुक्तांसह चौघांवर या कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. जो कोणी निष्काळजीपणाचे कृत्य करून मृत्यू घडवतो पण जो सदोष मनुष्यवध होत नाही. मात्र, गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा, द्रव्यदंड अगर दोन्हीही शिक्षेचे प्रावधान आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
आदर्श कॉलनीतील शाळेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये रविवारी दोन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मृतक मुलाचे वडील राजेश धनगावकर यांनी खदान पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त, संबंधित इंजिनिअर, संबंधीत कॉन्ट्रक्टर एनजीओ विरुद्ध भादंवि कलम ३०४ ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

समन्वयाचा अभाव की दुर्लक्ष?
रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी जलवर्धन नामक स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे अाहे. मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानात खड्डे खाेदण्यात अाले. यासाठी मनपातर्फे जेसीबी उपलब्ध करून दिली. २० मे राेजी खड्डे खाेदले. त्यानंतर जून जुलैत शहरात तुफान पाऊस झाला. शाेषखड्ड्यांमध्ये पाणी साचले. या खड्ड्यांमध्ये बारीक रेती, विटांचे तुकड्यांसह इतरही बांधकाम साहित्य टाकून बुजवणे अावश्यक हाेते. मात्र, खड्डे बुजवले नाहीत. परिणामी दाेन चिमुकल्यांचा जीव गेला. खड्डे बुजवण्यासाठी रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतलेली संस्था, मनपा लाेकप्रतिनिधींमध्ये समन्वय नव्हता की, दुर्लक्ष केले असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत अाहेत.

काँग्रेस महिला नेत्यांचा इशारा अन् कारवाईला वेग
शाेषखड्ड्यातीलपाण्यात बुडून दाेन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याप्रकरणी दाेषींवर कारवाई हाेण्यासाठी काँग्रेस महिला नेत्यांनी साेमवारी अांदाेलनाचा इशारा दिल्यानंतर पाेलिस जिल्हा प्रशासन सतर्क झाले. पाेेलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाला प्रारंभही केला.

मनपा शाळा क्रमांक १६ जवळ साेमवारी काँग्रेस अाघाडीच्या महानगराध्यक्ष सुषमा निचळ, जिल्हाध्यक्षा साधना गावंडे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी साेमवारी धाव घेतली. महिलांनी तीव्र अांदाेलनाचा इशारा दिला. त्यामुळे महसूल पाेलिस अधिकाऱ्यांनी महिला नेत्यांशी संपर्क साधत त्यांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे महिला नेत्यांनी अांदाेलन तूतार्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खड्डे बुजवण्यासही पुढाकार घेतला. काही महिलांनी नगरसेविकांच्या घरावर धाव घेण्याचाही प्रयत्न केला.

खड्डा हाेता १३ फूट
रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी एका स्वयंसेवी संस्थेने २० मे राेजी शाेषखड्डे केले हाेते. बाय चे तीन खड्डे करण्यात अाले. प्रारंभी या खड्ड्यांमध्ये डांबर टाकण्यात अाले. मात्र, खड्ड्यांमध्ये नंतर विटांचे तुकडे, बारीक रेती इतर बांधकाम साहित्य टाकून बुजवण्यात अाले नाहीत. साेमवारी खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेस महिलांनी पुढाकार घेतला. हा खड्डा तब्बल १३ फूट असल्याचे नेत्यांचे म्हणणे हाेते.

अांदाेलन करणार
खड्डे बुजवणे अावश्यक अाहे. खड्डे बुजवल्यास दुर्घटना घडते. त्यामुळे शहरात असे खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसतर्फे लवकरच अांदाेलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या महिला अाघाडीच्या महानगराध्यक्षा सुषमा निचळ यांनी दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...