आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाअाे जाअाे घर अब तुम्हारा, बँक खातेदारांच्या सुरक्षेचे धिंडवडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- शहरातील बहुतांश एटीएम केंद्रांसह पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे अाणि तेथील सुरक्षा रक्षकच असुरक्षित असल्याचे वास्तव उजेडात अाले. एटीएममधील सुरक्षा रक्षकाजवळ रक्षणासाठी ना काेणते शस्त्र, ना सुविधा, अशी विदारक स्थिती पाहावयास मिळाली. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी लुटारूंनी एटीएमच्या सुरक्षा रक्षकाची निर्घृण हत्या केल्याच्या पृष्ठभूमीवर अकाेल्यातील एटीएमच्या सुरक्षेची पाहणी करण्यात अाली. कुणीही या दरवाजा ढकला अाणि अातमध्ये या, असा खुला प्रवेश एटीएम केंद्रांमध्ये असल्याचे दिसून अाले.

केव्हाही काेठूनही पैसे काढता यावेत, यासाठी एटीएमचा शाेध लागला. क्रेडिट-डेबिट कार्ड िपन नंबरच्या साहाय्याने खात्यातील पैसे काढता येऊ लागले. या एटीएम मशीनच्या सुरक्षेबाबत सुरुवातीच्या काळात काळजी घेण्यात अाली. काही दिवस सुसज्ज सुरक्षा रक्षक, मॅग्नेटिक डाेअर, अशी खातेदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात अाली. मात्र, नंतर सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात अाले. त्यामुळे रात्री अपरात्री तर एटीएममधून पैसे काढणे हे अाता सुरक्षित राहिलेले नाही. तसेच एटीएमचे सुरक्षा रक्षकही सुरक्षित नसल्याचे साेमवारी केलेल्या पाहणीत दिसून अाले.
मॅग्नेटिकडाेअर नावालाच : एटीएमचेदार उघडण्यासाठी बाहेरच्या बाजूने क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करण्यासाठी छाेटीशी खिडकी असते. यामध्ये कार्ड स्वॅप केल्यानंतरच दार उघडते. एटीएम मशीन हाताळल्यानंतर दार उघडण्यासाठी जवळच माेठे बटण असते. हे बटण दाबल्यानंतरच दार उघडते. ही संपूर्ण प्रणाली केवळ जठारपेठ चाैकातील बँक अाॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये कार्यान्वित हाेती. रात्री वाजून मिनिटांनी दिव्य मराठीची चमू तेथे पाेहाेचली. मॅग्नेटिक डाेअर स्वॅप केल्यानंतर अावाज अाल्याने अातमधील सुरक्षा रक्षक बाहेर अाले. मशीन हाताळल्यानंतर दार उघडण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी बटण दाबण्यास सांिगतले. बटण दाबल्यानंतरच दार उघडले.

अाहेना पाेलिस : खदानपाेलिस स्टेशनच्या समाेर असलेल्या एका एटीएम केंद्रातील सुरक्षा रक्षकाशी दिव्य मराठीच्या चमूतील सदस्याने संवाद साधला. रक्षकाला सुरक्षेबाबत िवचारले असता त्याने समाेरच पाेलिस स्टेशन असल्याचे काही काळजी उर्वरित.पान
नसल्याचेत्यांनी सांगितले.

कायघडले हाेते राजस्थानमध्ये? : १०जून राेजी राजस्थानमधील झुनझूमध्ये लुटारूंनी एटीएम केंद्रात झाेपलेल्या सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची घटना उजेडात अाली हाेती. ही घटना रात्री घडली हाेती. लुटारूंनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले हाेते. त्यांनी चेहराही स्कार्पने झाकला हाेता. सुरक्षा रक्षकाजवळ स्वसंरक्षणासाठी शस्त्र असते तर त्याने प्रतिकार केला असता. त्याची हिंमतही वाढली असती. परिणामी, त्याचे प्राणही वाचले असते.

- शास्त्रीनगरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षा रक्षकाजवळ संरक्षणासाठी काेणतेही शस्त्र नव्हते. रक्षकही झाेपले हाेते.

- गोरक्षण राेडवरील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम केंद्राचे दार सताड उघडे हाेते. या ठिकाणी ना सुरक्षा रक्षक हाेता, ना केअर टेकर. येथून जवळच असलेल्या सेंट्रल बँक अाॅफ इंडियाच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक हाेता. मात्र, मॅग्नेटिक डाेअर प्रणाली कार्यान्वित नव्हती. संत तुकाराम चाैकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.

- जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एचडीएफसी बँकेच्या केंद्रात तीन सुरक्षा रक्षक हाेते. दै. दिव्य मराठीच्या चमूने मशीन हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाहीत. त्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने मदत केल्याने पैसे नघाले.

- जुने शहरातील एटीएम केंद्रेही वाऱ्यावर हाेती. जयहिंद चाैकातील एका एटीएमचे शटरच बंद हाेते. एका राष्ट्रीयीकृत खासगी बँकेचे एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक अाढळून अाले नाहीत.

- डाबकी राेडवरील चार एटीएम केंद्रांची पाहणी करण्यात अाली. भारतीय स्टेट बँक बँक अाॅफ महाराष्ट्रचे एटीएम केंद्र सताड उघडे हाेते. या दाेन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते. हीच स्थिती टिळक राेडवरील अॅक्सिस बँक युनियन बँकेच्या एटीएम केंद्रांची हाेती.

- रेल्वे स्टेशनवरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम केंद्र बंद हाेते. शटरवर ‘एटीएम बंद’, असे लिहिले हाेते. एलअायसी कार्यालयाजवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. तेथून जवळच असलेल्या रतनलाल प्लाॅट चाैकातील एटीएम केंद्राची स्थितीही अशीच हाेती.

- जवाहरनगर चाैकातील खासगी बँकेच्या दाेन एटीएम केंद्रांची पाहणी केली. या ठिकाणी एका केंद्रात एक सुरक्षा रक्षक असल्याचे दिसून अाले.
बातम्या आणखी आहेत...