आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच पावसात पालिकेची पोलखोल, मान्सूनपूर्व साफसफाई केल्याने गैरसोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- शहरात नगरपालिकेकडून मान्सूनपूर्व उपाययोजना आणि साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नाल्या नाले तुडुंब भरल्याने त्यातील घाणीसह सांडपाणी रस्त्यावर आले. त्यामुळे पहिल्याच पावसाने नगरपालिकेच्या कारभाराची एकप्रकारे पोलखोल केली आहे. नगरपालिकेने उपाययोजनांबाबत गांभीर्य दाखवल्याने नागरिकांना मात्र गैरसोय सहन करावी लागत आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत शहरात विविध समस्या उद‌्भवू नयेत या दृष्टीने नगरपालिकेने मान्सूनपूर्व साफसफाईची कामे करणे आवश्यक होते. मात्र, यासंदर्भात निष्काळजीपणा करून नगरपालिका प्रशासनाने अद्यापपर्यंतही शहरातील कोणत्याच भागात साफसफाईची कामे केली नाहीत. शहराच्या विविध भागांमध्ये नाले असून, पावसाळ्याच्या दिवसांत ते तुडुंब भरत असल्याने त्यातील पाणी रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे परिसरात घाण पसरून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. १९ जून रोजी रात्रीच्या वेळी शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे स्टेशन विभागातील बाहेती यांच्या दुकानासमोरील गल्लीलगत असलेली सांडपाण्याची नाली तुडुंब भरली. त्यामुळे त्यातील घाण, प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा रस्त्यावर आला. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला. पावसाळ्याची चाहूल लागताच नगरपालिका प्रशासनाने तातडीने नाल्यांच्या साफसफाईची कामे करणे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र, नगरपालिकेने याबाबत गांभीर्य दाखवले नाही. घाण सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याची माहिती परिसरातील महेश बाहेती सतीशचंद्र शर्मा यांनी नगरपालिकेला दिली.त्यानंतर पालिका प्रशासनाने आपल्या चुकांची दुरुस्ती म्हणून सफाई कामगारांच्या माध्यमातून साफसफाई केली. पहिल्याच पावसानंतर शहरात नाल्यांमधील घाण, कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. त्यामुळे पुढील काळात अशी समस्या उद‌्भवू नये यासाठी नगरपालिकेने साफसफाईस सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

२०१४ ची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे
साफसफाईकरण्यात आल्याने तसेच रेल्वे प्रशासनाने लावलेल्या जाळीमुळे बंद झालेला नाला २०१४ मध्ये पावसाळ्यात तुडुंब भरला होता. त्यामुळे स्टेशन विभागातील शनी मंदिर परिसरातील रहिवाशांच्या घरात घाण पाणी शिरले होते. त्यामुळे या नाल्याची त्वरित साफसफाई करावी तसेच रेल्वे प्रशासनाला जाळी काढण्यास सांगून नाला मोकळा करावा, अन्यथा २०१४ मध्ये झालेल्या प्रकाराची या वर्षीही पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केवळ अधिकारी वर्गाकडून अपेक्षा
पावसामुळे पालिकेचा दुर्लक्षित कारभार उघड झाला. नगरसेवकही अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. आता केवळ अधिकारी वर्गाकडूनच नागरिकांना अपेक्षा आहे. त्यांनी ही समस्या सोडवावी.'' सतीशचंद्र शर्मा, मूर्तिजापूर

कायमस्वरूपी उपाययोजना करावी
शहरातीलनाल्यांमधून वर्षभर सांडपाणी रस्त्यावर येऊन वाहते. त्यामुळे अधिकारी नगरसेवकांनी दखल घेऊन याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, ही अपेक्षा आहे.'' महेश बाहेती, व्यापारी,मूर्तिजापूर
बातम्या आणखी आहेत...