आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारंजा तालुक्यामधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभारी तहसीलदार जाधव यांना निवेदन सादर करताना लोकप्रतिनिधी. - Divya Marathi
प्रभारी तहसीलदार जाधव यांना निवेदन सादर करताना लोकप्रतिनिधी.
कारंजा- कारंजातालुक्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा विचार करुन शासनाने दुष्काळी स्थितीचा आढावा घेवून त्या संबंधी शासनाकडे वस्तूस्थिती सादर करावी, अशी मागणी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि अन्य लोकप्रतिनिधींनी प्रभारी तहसीलदार एस.आर.जाधव यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी यांना सोमवार, (ता. ७) रोजी सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार यावर्षीचा दुष्काळ गेल्या दोन वर्षाच्या दुष्काळाच्या पाठोपाठ आला असल्याने त्याचे भयंकर परिणाम आगामी काळात दिसणार आहे. सन २०१३-१४ चा कृषी हंगाम, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस गारपीटीत बुडाला. सन २०१४-१५ यावर्षी अवर्षणामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. तर, सन २०१५-१६ मध्ये जूनचा तिसरा आठवडा आणि आॅगस्टचा पहिल्या आठवड्याचा अपवाद वगळता पावसात मोठा खंड पडल्याने ८० ते ९० टक्के पेरा असलेले सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. मूग, उडीद, ज्वारी, कपाशी पिकांचे वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता पाऊस आला तरी झालेले नुकसान भरून निघणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतक-यांची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना बँक पुनर्गठनाचा लाभ मिळाला नाही. ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले त्यांना कमी प्रमाणात कर्ज मिळाले. त्यातून शेतीचा खर्च सुध्दा भागला नाही. त्यामुळे आता शेतक-यांवर दुष्काळाची परीस्थिती ओढावली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महिला बाल कल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे, पंचायत समिती सभापती वर्षाताई नेमाने, उपसभापती प्रमोद लळे, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, देवेंद्र ताथोड, बेबीताई चव्हाण, पंचायत समिती सदस्य मधुकर हिरडे, राजेश भोजने, सोनाली लांजेवार, विमलताई पत्रे, वंदना मेटे, श्रीराम कदम आदींची स्वाक्षरी आहे.महत्त्वाच्या विषयांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.