आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतकांनी सादर केला पर्यावरण समितीला गिट्टी खदान प्रस्ताव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- लालफितशाहीचा अंदाधुंद कारभार चव्हाट्यावर अाला असून, चक्क मृतक असलेल्या दाेन व्यक्तींच्या नावे गिट्टी खदानचा प्रस्ताव पर्यावरण समितीला सादर करण्यात अाल्याचा धक्कादायक प्रकार अाकाेट तालुक्यात उजेडात अाला अाहे. या ठिकाणाहून गाैण खनिजाचे उत्खनन सुरू अाहे. महसूल विभागाने या प्रकाराची चाैकशी केली असून, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला अाहे.

जिल्ह्यात गाैण खनिज उत्खननाच्या घटना नेहमीच उजेडात येतात. याप्रकरणी महसूल पाेलिस प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात येते. गाैण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहनेही प्रशासनाने अनेकदा जप्त केली हाेती. अाता तर मृतक व्यक्तींच्या नावे गिट्टी खदानचा प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर करण्यात अाल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. अकाेट तालुक्यातील खटकाळी येथील कमलाबाई शंकरराव साेयाम राजेंद्र बजरंगलाल अग्रवाल या दाेन मृतकांच्या नावे गिट्टी खदानचा प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर करण्यात अाला. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर महसूल प्रशासनाने चाैकशी केली. चाैकशीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल पाठवला अाहे. कमलाबाई सोयाम यांचा डिसेंबर २००७, तर राजेंद्र अग्रवाल यांचा मृत्यू मे २००९ राेजी झाल्याचे अहवालात नमूद केले. असे असतानाही त्यांच्या नावे गिट्टी खदानीचा प्रस्ताव २१ एप्रिल २०१३ राेजी पर्यावरण समितीकडे सादर करण्यात अाला. याबाबतचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला अाहे. या अहवालासाेबत मृतकांची प्रमाणपत्रेही जाेडण्यात अाली अाहेत.

अशीझाली चाैकशी : अकाेटतालुक्यातील गिट्टी खदानबाबत महसूल प्रशासनाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अकाेलखेडच्या मंडळ अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. त्यांनी कमलाबाई सोयाम राजेंद्र अग्रवाल यांचा मृत्यू केव्हा झाला, त्यांची कुठे जमीन अाहे, जमीन काेणाच्या ताब्यात अाहे, क्षेत्रफळ अादी संपूर्ण माहिती अहवालात नमूद केली. हा अहवाल त्यांनी २२ मार्च २०१६ राेजी तहसीलदारांना सादर केला. त्यानंतर तहसीलदारांनी चाैकशी करून अहवाल तयार केला. हा अहवाल तहसीलदारांनी २५ मे २०१६ राेजी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. अहवालासाेबत त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, फेरफार, सातबाराच्या प्रतीही सादर केल्या. नंतर जून महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला अाहे.

माफियांची हंमत वाढली : जिल्ह्यातगाैण खनिज माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच अाहे. दाेन महिन्यांपूर्वी तर तेल्हारा येथील तत्कालीन तहसीलदारांनी रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडल्याने त्यांना धमकी दिली हाेती. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून अाराेपींना अटकही केली हाेती. अधिकाऱ्यांना धमकी देण्यापर्यंत माफियांची मजल कशी गेली, असा सवाल उपस्थित करण्यात येत अाहे.

सरपंच,मंडळ अधिकाऱ्यांनी राहावे सतर्क :
संबंधितपरिसरातील मंडळ अधिकारी सरपंचसुद्धा गाैण खनिज चाेरीविराेधात पाेलिसात तक्रार देऊ शकतात. त्यामुळे मंडळ अधिकारी सरपंचांनी सावध राहणे अावश्यक अाहे. हे दाेन्ही घटक सावध राहिल्यास गाैण खनिजची चाेरी अथवा उपराेक्तसारखे प्रकार राेखणे शक्य हाेईल.
२७ काेटींची वसुली
जिल्ह्यात अनेक ठिकाणी गाैण खनिजचे उत्खनन हाेते. रेती, िगट्टीचा वऱ्हाडात पुरवठा हाेताे. गतवर्षी २७ काेटी रुपयांची राॅयल्टी वसूल करण्यात अाली. मात्र, अनेक िठकाणी गाैण खनिजचे अवैध उत्खनन हाेत असल्याने अाणि बेकायदेशीरपणे परवानगी घेण्यात येत असल्याने शासनाला काेट्यवधी रुपयांचा चुना लागत अाहे.

प्रशासनाने परवानगी दिली नाही. चाैकशीनंतर हा प्रकार गंभीर असल्याचे समाेर अाले. याबाबतचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पर्यावरण विभागाला पाठवला अाहे.'' जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी.
काय म्हणताे अहवाल...
खटकाळी येथील कमलाबाई सोयाम यांचा डिसेंबर २००७ राेजी मृत्यू झाला. याबाबत ग्रामपंचायतने मृत्यूचे प्रमाणपत्रही महसूल प्रशासनाला दिले. कमलाबाई यांच्या वारसाची नाेंद १० जून २००८ राेजी झाली.

समितीकडे २१ एप्रिल २०१३ राेजी सादर करण्यात अालेल्या प्रस्तावाच्या वेळी साेयाम यांचा मृत्यू झाला हाेता अाणि त्यांच्या नावे जमीनही नव्हती, असे अहवालात अाहे.

राजेंद्र बजरंगलाल अग्रवाल यांचा मे २००९ राेजी मृत्यू झाला. नगर परिषदेने मृत्यू प्रमाणपत्रही दिले. १४ नाव्हेंबर २०१० २३ सप्टेंबर २०१२ राेजी फेरफारद्वारे नाेंद करण्यात अाली. मात्र, पर्यावरण समितीकडे २१ एप्रिल २०१३ राेजी सादर करण्यात अालेल्या प्रस्तावाच्या वेळी ते मृत हाेते अाणि त्यांच्या नावे जमीनही नव्हती, असे अहवालात नमूद करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...