आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य तपासणीत आढळला २१८ बालकांना हृदयरोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- राष्ट्रीयग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून या वर्षी जिल्ह्यातील एक हजार ९२९ शाळांमधील तीन लाख ५४ हजार २३८ पैकी तीन लाख २७ हजार २६४ बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९१.०२ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. या तपासणीत २१८ विद्यार्थ्यांना हृदयरोग असल्याची धक्कादायक बाब निष्पन्न झाली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी आणि प्राथमिक विद्यालयातील बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ९२९ अंगणवाडी प्राथमिक विद्यालयांमधील तीन लाख २७ हजार २६४ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील ४१ हजार ६९४, चिखली तालुक्यातील ३७ हजार ७२६, देऊळगावराजा तालुक्यातील १२ हजार ८९५, सिंदखेडराजा तालुक्यातील २४ हजार २५५, लोणार तालुक्यातील १८ हजार ७६४, मेहकर तालुक्यातील ३९ हजार ८७५, मोताळा तालुक्यातील २६ हजार १७३, मलकापूर तालुक्यातील १७ हजार ३५०, नांदुरा तालुक्यातील २० हजार ४७९, जळगाव जामाेद तालुक्यातील १८ हजार १०, संग्रामपूर तालुक्यातील २० हजार ५०९, शेगाव तालुक्यातील १२ हजार ७५५ आणि खामगाव तालुक्यातील ३७ हजार ७७९ बालकांची तपासणी करण्यात आली.

मोताळा वगळता सर्वच शाळांमध्ये तपासणी
जिल्ह्यातएक हजार ९३० शाळा अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार होती. सर्वच तालुक्यांमध्ये संपूर्ण शाळांची तपासणी झाली. केवळ मोताळा तालुक्यात एक शाळेची तपासणी झाली नाही. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आजारांबाबत माहिती प्राप्त झाली आहे.

विविध शाळांमध्ये आढळलेले हृदयरुग्ण
मोताळा- २३, देऊळगावराजा - ७, सिंदखेडराजा - २९, नांदुरा - २८, संग्रामपूर - ३, जळगाव - १० , चिखली ८२, खामगाव - २६, शेगाव - ८, लोणार -२ बुलडाणा, मलकापूर मेहकरमध्ये हृदयरोगी बालक आढळून आला नाही. दरम्यान, २६ हजार ९७४ बालकांची तपासणी अद्याप राहिली आहे.

वेळेवरील उपचारासाठी तपासणी
जिल्ह्यातीलएक हजार ९२९ अंगणवाडी प्राथमिक विद्यालयांमधील बालकांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली आहे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी ९१ टक्के तपासणी मोहीम पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्या विभागाने दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना वेळेवर उपचार मिळावे या उद्देशाने अंगणवाडी शाळांमध्ये ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती आहेत ह्रदयरोगी बालक...