आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी आकारून पेट्रोलपंपांवर लूट, सेल्स ऑफिसरसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एलबीटी(स्थानिक स्वराज्य संस्था कर) शासनाने रद्द केल्यानंतरही ग्राहकाला मिळत असलेल्या पेट्रोलमध्ये एलबीटी आकारल्या जात आहे. यामुळे ग्राहकांना जादा दराने पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे. याशिवाय इथेनॉलचा वापर वाढल्याने ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. याकडे मात्र पेट्रोलपंप कंपनीच्या सेल्स ऑफिसरसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पेट्रोलपंपांवर २४ तास वाहनधारकांची रीघ लागलेली दिसून येते. कंपनी नियमानुसार प्रत्येक पेट्रोलपंपावर मूलभूत सुविधा जसे की, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेट, प्रथमोपचार पेटी असणे बंधनकारक आहे. ‘दिव्य मराठी’ने १८ ऑगस्ट रोजी केलेल्या पाहणीत अनेक पेट्रोलपंपांवर ही व्यवस्थाच आढळून आली नाही. या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही कंपनीचे अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्यामुळेच ग्राहकांना या सुविधापासून वंचित राहावे लागत आहे.

मुख्य रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर १५ मिनिटांच्या अंतरामध्ये व्यक्ती बॉटलमध्ये सर्रासपणे पेट्रोल भरताना आढळून आल्या. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी रांजण ठेवण्यात आला होता. त्यातही पाण्याचा ठणठणाट होता. कर्मचाऱ्याला विचारले असता आम्ही फक्त उन्हाळ्यात पाणी भरतो असे सांगितले. वास्तविकत: कंपनी नियमानुसार मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम कागदावर असल्याचे वास्तव दिसून आले. पेट्रोलपंपाची तपासणी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांनाही यांच्याशी काहीही सोयरसूतक राहिले नसल्याने ग्राहकांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

संपर्कक्रमांक नाहीत अपडेट : अग्रसेनचौकातील एका पेट्रोलपंपावर सेल्स ऑफिसरचे अपडेट नंबर नाहीत. त्यामुळे ग्राहकाला जर तक्रार करायची झाल्यास त्याने तक्रार कुठे करावी, हा प्रश्न उपस्थित होतो.

तक्रारीवर कारवाई
पुरवठाविभागाच्या अधिकाऱ्याकडून पेट्रोलपंपांची तपासणी सुरू असते. मुळात नियंत्रणाची जबाबदारी संबंधित कंपनीच्या सेल्स ऑफिसरची असते. तक्रार आल्यास आम्ही कारवाई करतो. - अनिलटाकसाळे, जिल्हापुरवठा अधिकारी, अकोला

वाद करू नये
सर्वपेट्रोलपंप संचालकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ग्राहकांनीसुद्धा बॉटलमध्ये पेट्रोलमध्ये पेट्रोल मागण्याचा आग्रह धरू नये. बरेचदा यामुळेच वाद होतात. राहुलराठी, अध्यक्ष,पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिएशन, अकोला.

तक्रारीची दखल घेतो
ग्राहकांच्यातक्रारीची आम्ही निश्चित दखल घेतो. दर तीन महिन्यांतून पेट्रोलपंपाची तपासणी केली जाते. पेट्रोलपंपावर काही असुविधा असल्यास ग्राहकांनी तक्रार तक्रार बुकमध्ये तक्रारीची नोंद करावी. - कपिलपोतदार, सेल्सऑफिसर, बीपीसीएल.

पेट्रोलमध्ये वाढले इथेनॉलचे प्रमाण : यापूर्वीपेट्रोलमध्ये इथेनॉल टक्के मिश्रित केल्या जात होते. काही दिवसांपासून १० टक्के एवढे प्रमाण झाले आहे. इथेनॉल लवकर पाणी बनून जात असल्याची माहिती एका पेट्रोलपंप संचालकाने दिली. शासन इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याचा विचार करीत आहे, असे झाल्यास यात ग्राहकांना पेट्रोल कमी अन् इथेनॉल जास्त मिळेल. याचा वाहनाचा अॅव्हरेजवर निश्चित परिणाम होईल.

शहरातील काही पेट्राेलपंपांवर ग्राहकांना बाटलीत पेट्रोल देण्यात येते. तसेच सर्वच पेट्रोलपंपांवर शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

बॉटलमध्ये पेट्रोल द्यायचे की नाही, याबाबत एका पेट्रोलपंप संचालकाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना लेखी मागितले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नसल्याचे सांगितले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, ग्राहकांनी काय करावे?