आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेचा झाला बट्ट्याबोळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा- राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून जुलै रोजी या एकाच दिवशी तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन मोठा गाजावाजा करुन दोन कोटी वृक्ष लागवड योजना अंमलात आणली.या योजनेअंतर्गत तालुक्यात सर्वत्र वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र वृक्षाचे संवर्धन संगोपन झाल्यामुळे तालुक्यात या योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र आहे.

राज्यातून जिल्ह्यात जिल्ह्यातून प्रत्येक तालुकास्तरावर राबवलेल्या या योजने अंतर्गत तालुक्यात प्रत्येक शाळा, ग्राम पंचायत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, महाविद्यालयांनी वृक्षारोपण करुन झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता मात्र अनेक ठिकाणी झालेली नाही. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास येथील नगर पालिकेच्या शाळांमध्ये किती झाडे लावण्यात आली त्यापैकी किती झाडे अस्तित्वात आहे. याचा शोध घेतल्यास लक्षात येईल.या ठिकाणी लावलेली झाडे तिही आता दिसत नाहीत.संस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी रोपटी लावण्याचा प्रकल्प हाती घेतला. काहींनी केलेली वृक्ष लागवड ही यशस्वीही ठरली. मात्र, हे वृक्ष जगलेत का? याचे संवर्धन होत आहे का, याची दखल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हिच परिस्थिती इतर ठिकाणी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींचा शोध घ्यावा जेणे करुन उर्वरीत झाडे लावून उद्दिष्टाची पूर्तता होवू शकते अन्यथा या योजनेचा ही शतकोटी वृक्ष लागवड योजने प्रमाणे बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.

वृक्षाराेपणानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कटघरे उभारण्यात आल्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली.

वृक्षांचे संगोपन, संवर्धनाचे पत्र दिले
नगर पालिकेअंतर्गत६८० वृक्ष लागवड करण्यात आली असून, त्या मध्ये नगर पालिकेची शाळा, मुस्लिम दफनभूमी, हिंदू स्मशान भूमी आदींचा समावेश आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना संबंधित विभागाच्या प्रमुखांना वृक्ष संवर्धन संगोपन या संबंधी पत्र देऊन सूचना देण्यात आल्या आहे. -प्रमोद वानखडे , मुख्याधिकारी न.प.कारंजा

संरक्षण जाळीची मागणी नाही
दोन कोटी वृक्षलागवड योजनेची माहिती मिळताच येथील विक्रेत्यांनी संरक्षण जाळी (ट्री गार्ड ) विक्री साठी दुकानात आणले होते. मात्र वृक्षारोपण झाल्यानंतरही जाळीची मागणी करणारे ग्राहक उपलब्ध झाले नसल्याची माहिती आफताफ ट्रेडर्सचे संचालक शोएब मरछिया यांनी दिली.

वृक्षांना संरक्षण जाळी आवश्यक
दोन कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत तालुक्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. या योजनेला प्रतिसाद मिळाला, वृक्षाचे संवर्धन संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. वृक्षाच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळीचा उपयोग केलेला नसल्यामुळे मोकाट जनावरांनी हे वृक्ष नष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...