आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटांचा काळाबाजार करणारा दलाल अटकेत, रेल्वे गुप्त वार्ता विभागाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलारेल्वेस्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका दलालाला भुसावळ आरपीएफ गुप्त वार्ता विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या दलालाकडून ५० हजार रुपयांची तिकिटे ताब्यात घेण्यात आली आहेत. अकोला आरपीएफच्या हद्दीत कारवाई झाल्यामुळे येथील रेल्वेस्थानकावर दलालांचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
रेल्वेस्थानकावर दलाल रेल्वेचे आरक्षित तिकिटे विकत घेऊन ती दामदुपटीने विकतात, अशी माहिती गुप्त वार्ता विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या अाधारे गुरुवारी विभागाचे पथक अकोल्यात दाखल झाले. त्यांनी सापळा रचून एका महाराजाला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे दूरदूरची हजारो रुपयांची आरक्षित तिकिटे आढळून आली. त्याला अधिकाऱ्यांनी पोलिस खाक्या दाखवताच त्याने आपण तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची कबुली देत सर्व तिकिटे पथकाच्या ताब्यात दिली. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानकावर सामान्यांना महिनोंमहिने आधी तिकिटे काढूनही त्यांचे तिकीट कन्फर्म होत नाहीत. मात्र, दलालांकडे तिकिटे उपलब्ध असतात. ज्यांना कुणाला आरक्षित तिकिटे घ्यायची असतील त्यांना अशा दलालांकडून चारपटीने पैसे मोजून तिकिटे घ्यावी लागत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबीचा त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

तत्काळ खिडकीवर पहिला नं. दलालांचा
तत्काळचेआरक्षण करण्यासाठी पहिला नंबर लागावा, यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते. कारण, ते ऑनलाइन असल्यामुळे जो पहिल्यांदा तिकीट काढेल, त्याचे तिकीट कन्फर्म होते. मात्र, तत्काळच्या खिडकीवर पहिला नंबर दलालांचा असतो. येथे प्रवाशी जरी पहिल्या नंबरवर उभा असला, तरी त्याला धाकदपट केल्या जाते. अनेकवेळा प्रवाशी आणि या दलालांमध्ये हातापाई होते. यामुळे अनेकदा वादविवादही वाढतात.

दलालांकडून कमिशनबाजी
एकाप्रवाशाला दोन तिकिटे देण्याचा नियम आहे. मात्र, दलालांकडे एकापेक्षा अनेक तिकिटे कसे येतात, हा प्रश्न आहे. अशा दलालांना तिकीट खिडकीतून तिकिटे मिळतातही. मात्र, अशी तिकिटे देण्यामागे अनेकांना त्यातून कमिशन मिळत असल्यामुळे तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.