आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी, रुग्ण यांना दररोज नावेतून गाठावा लागतो पैलतीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा- अडाण नदीवर ४५ वर्षांपूर्वी उभारलेल्या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सहा गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे तालुक्यातील वाघोळावासियांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. येथील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण शेतकऱ्यांना नावेतून प्रवास करून दैनंदिन काम करावे लागते.

या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, प्रकल्पाचा फायदा प्रकल्पबाधित गावांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याला आहे. असे असले तरी, शासनाने प्रकल्पबाधित गावात आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या नाही. ग्राम वाकी- वाघोळा या दोन गावात केवळ नदी आडवी असून वाघोळावासियांना तालुका ठिकाण गाठण्यासाठी पावसाळ्यात अडचण होते. शासनाच्या धोरणामुळेच येथील शेकडो कुटुंब विकासापासून वंचित आहेत. या गावात आजपर्यंत एस.टी.गेली नाही. इंझोरीवरुन किलोमिटर फेरा असलेला रस्ता असताना या रस्त्याने पायी जाणे कठीण आहे. परिणामी नागरिक नावेतूनच प्रवास करतात. विशेष म्हणजे वाघोळा गावात वी नंतर पुढील शिक्षणाची सोय नाही; परंतु शिक्षणाची ओढ असल्याने विद्यार्थ्यांना नावेत बसून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अडाण नदी जिल्ह्यातील मोठ्या नंद्यापैकी एक असून, तिचे पात्र जवळपास एक हजार फूट आहे. आता याच नदीवर जिल्ह्याच्या सीमेवर मानोरा तालुक्यात १९७२ मध्ये भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करताना मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, घोटी आणि जामदरा, तर कारंजा तालुक्यातील दिघी आणि वाघोळा या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावांचे पुनर्वसन करताना मात्र शासनाने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा ४५ वर्षांतही उपलब्ध केल्या नाहीत. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. त्यांना उपलब्ध नसलेल्या मुख्य सुविधांमध्ये दळणवळणाची मजबूत व्यवस्था आणि शिक्षण, आरोग्य या सुविधांचा समावेश आहे. वाघोळावासीय त्रास सहन करत आहेत.
सुविधा त्वरित उपलब्ध करुन देण्याची गरज
आम्हाला शाळेत जाण्यासाठी मार्गच नाही. गावात वी नंतर पुढील शिक्षणाची सोय नाही; परंतु शिक्षणाची ओढ असल्याने आणि शिक्षण आवश्यक असल्याने आम्ही नदीपात्रातून नावेत बसून जीव धोक्यात घालून प्रवास करित आहोत. पूनमसावंत, विद्यार्थिनी, वाघोळा

जीव धोक्यात घालून प्रवास
या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि शिक्षण सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसांत तर त्यांची परिस्थिती अधिकच भीषण होते. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी नावेतून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...