आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यात जिल्ह्यातील टँकरची संख्या ५१९ वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पावसानेओढ दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला अाहे. तब्बल लाख ८१ हजार नागरिकांना टँकरच्या पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात ४०० टँकर सुरू होते. मात्र, आता ऐन पावसाळ्यात टँकरची संख्या ५१९ वर गेली आहे.

गेल्या वर्षी जून ते ऑगस्टअखेर ७१ टक्के पावसाची नोंद झाली होती. कमी पावसामुळे जानेवारीपासूनच ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढू लागली होती. फेब्रुवारीत जिल्ह्यात २० टँकर सुरू होते. त्यानंतर सातत्याने टँकरच्या मागणीत वाढ होत गेली. मार्च महिन्यात टँकरची संख्या दीडशेवर गेली. एप्रिल महिन्यात टँकरची संख्या ३०० झाली. मे महिन्यात ही संख्या ३८० वर गेली. जूनअखेरपर्यंत ४७२ टँकरने सहा लाख लोकांना पाणीपुरवठा सुरू होता.
जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. ते १५ जून या कालावधीत चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जुलै, ऑगस्ट महिना पावसाचा असतो. मात्र, हे दोन्ही महिने कोरडे गेले. तब्बल तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली, तरी टँकरची संख्या कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. गेल्या आठ दिवसांत १५ टँकर वाढले आहेत. सप्टेंबरपर्यंत ३७६ गावे १६४६ वाड्या-वस्त्यांना ५१९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यातील लाख ८१ हजार ६८८ नागरिकांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
अकोले, श्रीरामपूर राहुरी तालुक्यात अद्याप टँकर सुरू नाहीत. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक १०१ टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात ८० कर्जत, जामखेड तालुक्यांत ५६ टँकर सुरू आहेत. कमी पावसामुळे ग्रामीण भागातून टँकरला मागणी वाढत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ५१९ टँकरपैकी २० टँकर फक्त शासकीय आहेत. उर्वरित ४९९ टँकर खासगी आहेत. दहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरने माणशी अंदाजे २० लिटर याप्रमाणे पाणी दिले जाते. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यातील १०० लिटरहून अधिक पाणी वायाच जाते. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही.
तालुकािनहायटँकर संख्या
संगमनेर३०, कोपरगाव ६, नेवासे ४६, राहाता ३, नगर ४९, शेवगाव ५६, कर्जत ५६, जामखेड ३८ श्रीगोंदे २७. कर्जत नगरपालिकेने ५, तर जामखेड नगरपालिकेने २६ टँकर सुरू केले आहेत.
टँकरचे प्रस्ताव पडूनच
टँकरमंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असले, तरी मागणी करून तालुका प्रशासनाकडून प्रस्ताव मंजूर केले जात नाही. तालुकास्तरावर मोठ्या संख्येने प्रस्ताव प्रलंबित असून, ते तातडीने मंजूर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली...
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील सातवड (ता. पाथर्डी) या गावात आले होते. या गावातील पॉलिहाऊसची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांसमोर गावात टँकर सुरू करण्याची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी टँकर सुरू करण्याची सूचना दिल्यानंतरही या गावात अद्याप टँकर सुरू झालेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला प्रशासनानेच केराची टोपली दाखवली.